आषाढी वारीचा निधी लोककल्याणासाठी वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:48+5:302021-06-19T04:07:48+5:30
कोरोना संसर्गामुळे गतवर्षी आषाढी व कार्तिकी वारी सोहळा अत्यल्प लोकांमध्ये साजरा करण्यात आल्याने संबंधित काळात सोयी-सुविधांवर होणारा खर्च टळला ...
कोरोना संसर्गामुळे गतवर्षी आषाढी व कार्तिकी वारी सोहळा अत्यल्प लोकांमध्ये साजरा करण्यात आल्याने संबंधित काळात सोयी-सुविधांवर होणारा खर्च टळला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा शिल्लक निधी आळंदीतील लोककल्याण कामांकरिता वापरण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे वारकरी सांप्रदायातील मृत पावलेल्या व आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी द्यावी. तसेच गरजू पौराेहित्य करणाऱ्या ब्राम्हण समाज, कर्मचारी व इतर घटकांना आर्थिक मदत करावी. आळंदीतील ग्रामदैवत श्रीमंत भैरवनाथ मंदिर व कुलदैवत खंडोबा मंदिर जीर्णोद्धार कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन आळंदी विकास युवा मंचने मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दिले आहे.