‘मार्केटिंग’साठी होतोय भिकाऱ्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:01 AM2018-12-20T02:01:12+5:302018-12-20T02:01:15+5:30

प्रस्थापित समाज आणि बदलत्या विकासाच्या प्रवाहापासून बºयाच अंतरावर उभ्या असलेल्या गरिबांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो.

Use of Beggars for 'Marketing' in pune | ‘मार्केटिंग’साठी होतोय भिकाऱ्यांचा वापर

‘मार्केटिंग’साठी होतोय भिकाऱ्यांचा वापर

googlenewsNext

युगंधर ताजणे

पुणे : जिथे दोनवेळच्या भाकरीची भ्रांत अशावेळी कुणी हातावर शंभर किंवा दोनशे रुपयांची नोट ठेवली तर आनंदाने तो सांगेल ते काम केले जाते. न बोलणाºयाचे सोनेही विकले जात नाही, तर दुसरीकडे बोलणाºयाची मातीही विकली जाते. या उक्तीनुसार सध्याच्या ‘मार्केटिंग’च्या जमान्यात प्रत्येकाचा निभाव लागणे कठीण आहे. आता तर आपल्या एखाद्या वस्तुची, उत्पादनाची इतकेच नव्हे तर नव्याने सुरुवात करीत असलेल्या कंपनीच्या ‘जाहिराती’करिता रस्त्यावरील भिकाºयांचा आधार घेतला जात आहे.

प्रस्थापित समाज आणि बदलत्या विकासाच्या प्रवाहापासून बºयाच अंतरावर उभ्या असलेल्या गरिबांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो. रस्त्यावर भीक मागणे, एखाद्या सणावाराला खासकरून दिवाळी, नाताळ, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी हातात झेंडे घेऊन सिग्नलवर चारचाकी गाडीच्या खिडक्यांवर ती लहान मुले लक्ष वेधून घेतात. मोठ्या व्यक्ती गजरे, टिश्यूपेपर, फुगे, अंकलिपी, खेळणी या वस्तु विकण्याकरिता गाडीच्या मागे पुढे करताना दिसतात. दिवसभरातून मोजकीच कमाई हाती येणाºया या व्यक्तींपुढे रात्री जेवणाचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्यात त्या लहान मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्या या परिस्थितीचा उपयोग विविध कंपन्यांच्या मार्केटिंगमधील व्यक्तींनी करून घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.
जंगली महाराज रस्ता, डेक्कन बस स्टॉप, एफ. सी. रस्ता, प्रभात, बाजीराव रस्त्यांवरील भिकाºयांचा खासकरून लहान मुलांचा आपल्या उत्पादनांची, वस्तुंची जाहिरात करण्याकरिता उपयोग करून घेतला जात आहे. यात काही वेळा उत्पादनाविषयी माहिती देणाºया पॅम्प्लेटस वाटणे, तर कधी पोस्टर्स चिकटवणे यांसारखी कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. इतकेच नव्हे, तर व्हिजिटिंग कार्ड वाटण्याचे कामदेखील काही लहान मुलांना दिले जात आहे. त्यांना खाऊ-पिऊ घालून किंवा खिशात शंभर-दोनशेची नोट टाकून मोठ्या खुबीने त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे. बाजारात पॅम्प्लेट वाटणे, भित्तीपत्रके चिकटविणे, व्हिजिटिंग कार्ड किंवा उत्पादनविषयक माहितीपत्रके वाटणाºयांचे ‘फिक्स रेट’ ठरले असताना दुसरीकडे या रस्त्यावरील भिकाºयांकडून स्वस्तात काम करून घेतले जात आहे.

पैसा मिळाला हे महत्त्वाचे
४डेक्क्नच्या पुलावर भिकारी असणाºया रतनला याविषयी विचारले असता तो म्हणाला, नाही तरी दिवसभर फारसे काम असते कुठे? तेव्हा एकवेळ कमी पैसे मिळाले तरी जेवणाचा प्रश्न सुटतो.
४आपण एकटे नसतो आपल्याबरोबर रस्त्यावर झोपणारे कुटुंबदेखील आहे. त्यांनाही खाऊ घालावे लागते. हे खरे की, कमी पैशांत जास्त काम करून घेतले जाते. पण मी त्या कामाला नाही म्हटलो तर दुसरा कुणी ते करण्याकरिता उभा राहतो. अशा वेळी शांतपणे राहणे जिवावर येते.

मार्केटिंगचा वेगळा फंडा...
४बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, एखाद्या प्रसंगी चहाच्या टपरीवर लहान मुलांच्या हातात हमखास वेगवेगळ्या रंगाची, आकाराची माहितीपत्रके दिसतात. ते ती वाटतात किंवा भिंतीवर चिकटवतात. दिसेल त्याच्या हातात ते माहितीपत्रक देतात. त्यांच्या खिशात व्हिजिटिंग कार्डचा गठ्ठा असतो. चहा पिण्याकरिता आलेल्या व्यक्तींना ती वाटली जातात.
४एकीकडे शहरातील अनेक सामाजिक संस्था भिकारी मुलांचे जीवनमान सुधारण्याकरिता प्रयत्नशील असताना दुसºया बाजूला कमी मोबदला देऊन त्यांच्याकडून ‘मार्केटिंग’चे काम करवून घेतले जाते.

Web Title: Use of Beggars for 'Marketing' in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे