प्रदूषण टाळण्यासाठी शवदाहिनीचा उपयोग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:34+5:302021-03-08T04:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : ‘‘महाराष्ट्रातील सर्वात पहिली गॅस शवदाहिनी नारायणगाव येथील आहे. सर्व समाज बांधवांनी प्रदूषण टाळण्यासाठी गॅस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : ‘‘महाराष्ट्रातील सर्वात पहिली गॅस शवदाहिनी नारायणगाव येथील आहे. सर्व समाज बांधवांनी प्रदूषण टाळण्यासाठी गॅस शवदाहिनीचा वापर करावा. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी,’’ असे आवाहन सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांनी नारायणगाव येथे केले.
नारायणगाव येथील ग्रामस्थांच्या बैठकीत पाटे बोलत होते. या बैठकीला माजी सरपंच अशोक पाटे, संतोष वाजगे, एकनाथ शेटे, अशोक गांधी, राजेंद्र बोरा, डॉ. संदीप डोळे, जितेंद्र गुंजाळ, दीपक वारुळे, शिरीष जठार, रामभाऊ तोडकरी, ज्ञानेश्वर दळवी, राजाराम पाटे, आशिष माळवदकर, महेश शिंदे, संजय वाजगे, मुकेश वाजगे, गणेश वाजगे, विकास तोडकरी, आरिफ आतार, संजय मुनोत, एम. डी. भुजबळ, राजू पाटे, भागेश्वर डेरे, रमेश मेहेत्रे, रशिद इनामदार, उल्हास दळवी, बाळासाहेब तांबे, राजेंद्र कोल्हे, बबन पानसरे, विलास दळवी, रोहिदास तांबे, संतोष दांगट, संतोष पाटे, राजेश बाप्ते, अनिल खैरे, संजय खैरे उपस्थित होते.
सरपंच पाटे म्हणाले, रूढी, परंपरा याचा आदर आहे आणि तो राखलाच पाहिजे. मात्र, काळानुसार परंपरेत बदल करणे गरजेचे आहे. तरुण पिढीने प्रदूषण टाळण्यासाठी गॅस शवदाहिनीचा वापर करावा. याबाबत जनजागृती करावी. पारंपरिक पद्धतीची लाकडी दहन शेगडी पत्रे लावून बंद करण्यात येईल, प्रदूषण टाळण्यासाठी पुढील काळात गॅस शवदाहिनीचा करावा, असे आवाहान सरपंच पाटे यांनी केले त्यास उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला. नारायणगावातील स्थानिकांसाठी अंत्यविधी सेवा मोफत आहे. बाहेरील व्यक्तीसाठी १५०० रुपये दर घेण्यात येतात. नारायणगाव येथे सुसज्ज हॉस्पिटल करण्याचा मनोदय पाटे यांनी व्यक्त केला. त्यास ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देऊन हॉस्पिटलसाठी पर उंबरा निधी गोळा करून रुग्णालय उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी अनेकांनी डॉक्टरांच्या सेवेविषयी नाराजी व्यक्त केली.