मराठा मोर्चा नियोजनासाठी ड्रोनचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:11 AM2017-08-10T03:11:49+5:302017-08-10T03:11:49+5:30
मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चासाठी पुण्यामधून तसेच लगतच्या महामार्गांवरून मोठ्या प्रमाणावर वाहने जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन केले होते.
पुणे : मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चासाठी पुण्यामधून तसेच लगतच्या महामार्गांवरून मोठ्या प्रमाणावर वाहने जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन केले होते. विशेष म्हणजे कोठेही कोंडी होऊ नये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्गांवर
तातडीची मदत पोचविणे शक्य व्हावे तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता चक्क ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवण्यात येत होते. नियंत्रण कक्षामध्ये बसून स्वत: उपायुक्त अशोक मोराळे नियमनाबाबत सूचना देत होते.
मुंबईतील मोर्चाला मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर जाणार असल्याने वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता होती. लाखोंचे जथ्थे वाहनांनी मुंबईकडे जाणार होते. कोल्हापूर, सांगली, साताºयाकडून येणारी वाहतूक कात्रज, बाह्यवळण रस्ता, मुंबई-बंगळुरू महामार्गावरूनच जाणार होती.
यासोबतच सोलापूरकडून आलेली वाहने कात्रज, स्वारगेट किंवा नगर रस्त्याकडून मुंबईकडे जाणार होती. मोठ्या प्रमाणावर वाहने येणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडसर होऊ नये, याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली होती. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सूचनांनुसार चोख नियोजन करण्यात आले होते.
शहरात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे कॅमेरे स्थिर आहेत. त्यामुळे फिरत्या कॅमेºयांची आवश्यकता होती. ड्रोनचा वापर केल्याने कोंडी टाळण्यात पोलिसांना यश आले. बºयापैकी वाहने रात्रीतूनच मुंबईकडे रवाना झाल्याने कोंडी झाली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
विसर्जन मिरवणुकीवरही ड्रोनद्वारे लक्ष
गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणूक ही पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील आणि कळीची बाब असते. लक्ष्मी रस्त्यावरून मुख्य मिरवणुका जातात. यासोबतच टिळक रस्त्यावरूनही महत्त्वाची मिरवणूक जाते. कुमठेकर रस्त्यावरूनही मंडळांच्या मिरवणुका जात असतात. लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यांवर ठिकठिकाणी चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या कॅमेºयांच्या जोडीला यंदा ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.
कात्रज चौक, चांदणी चौक आणि वाकड पूल चौकामध्ये तीन ठिकाणी ड्रोन कॅमेरे ठेवण्यात आले होते. ड्रोन कॅमेºयांद्वारे चौकांसह एक किलोमीटरपर्यंत महामार्गावर वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत होते.
रस्त्यावर काही अडचण निर्माण झाली किंवा अपघात झाला, रास्ता रोकोसारखी आंदोलने झाली तर तातडीने उपाययोजना करता याव्यात आणि वस्तुस्थिती समजावी याकरिता थेट तिसºया डोळ्याचा उपयोग पोलिसांनी करून घेतला.