महोत्सवासाठी थोर व्यक्तींच्या नावांचा वापर

By admin | Published: December 11, 2014 12:26 AM2014-12-11T00:26:12+5:302014-12-11T00:26:12+5:30

पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही मंजुरीसाठी दिलेल्या युवा व महिला महोत्सवास बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.

Use of great names for the festival | महोत्सवासाठी थोर व्यक्तींच्या नावांचा वापर

महोत्सवासाठी थोर व्यक्तींच्या नावांचा वापर

Next
पुणो : पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही मंजुरीसाठी दिलेल्या  युवा व महिला महोत्सवास बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. तसेच महोत्सवांना मान्यता मिळविण्यासाठी थोर व्यक्तींच्या नावांचा वापर करण्याचा नवा फॉम्र्यूला सत्ताधा-यांनी राबविला. यामुळे दबावासाठीच थोर व्यक्तींच्या नावाचा वापर होत असल्याचे समोर आले.  
महापालिकेमध्ये पक्षनेत्यांच्या बैठकीत महोत्सवांना काही राजकीय पक्षांनी विरोध केला. या वेळी हा महोत्सव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पक्षांनी विरोध न करता, त्यास मान्यता दिली. तसेच, स्थायी समितीत त्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आज समितीच्या बैठकीत आल्यानंतर, त्यावर या राजकीय पक्षाच्या सदस्यांनी चर्चाही सुरू केली. मात्र, त्या चर्चेमुळे महोत्सवास मान्यता मिळणार नाही, असे निदर्शानास येताच या महोत्सवास सावित्रीबाई फुले यांच्या नावाप्रमाणोच ‘राजमाता जिजाऊ उत्सव’ असे नाव द्यावे, अशी उपसूचना देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही नावांना विरोध केल्यास, तो आपल्या अंगलट येईल म्हणून या सदस्यांनीही त्यास विरोध न करता मान्यता दिली. त्यातील काही समिती सदस्यांनी समितीची बैठक संपल्यानंतर, नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. 
पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना, असे महोत्सव घेणो योग्य आहे का, अशी विचारणा केली असता पक्षनेत्यांनी घेतलेला निर्णय धोरणात्मक असल्याने, हा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थायी समितीची असल्याचे समितीचे अध्यक्ष बापूराव कण्रेगुरुजी यांनी सांगत या निर्णयाचे समर्थन केले आहे. 
पुणोकरांच्या निधीची विश्वस्त असलेल्या समितीलाच खर्चाची घाई असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काही वर्षापूर्वी शहरात महोत्सवांचे पेव फुटले होते. पालिकेच्या वतीने घेतल्या जाणा:या महोत्सवासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. 
या महोत्सवांमध्ये पालिकेतील माननीय आणि ठेकेदारांचा अधिक फायदा होत असल्याने यावर कोर्टानेही ताशेरे ओढले होते.
(प्रतिनिधी)
 
4काही दिवसांपूर्वी पक्षनेत्यांच्या बैठकीत सावित्रीबाई फुले जयंती (3 जानेवारी) ते जागतिक महिला दिन (8 मार्च) या कालावधीत युवा व महिला सक्षमीकरण महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी 5क् लाख रुपये खर्च येणार आहे. पक्षनेत्यांनी घेतलेल्या या निर्णयावर सर्व स्तारातून टीका होत असताना, स्थायी समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, समितीनेही पक्षनेत्यांच्या निर्णयाचीच ‘री’ ओढत हे महोत्सव घेण्यास मान्यता दिली. 
 
ते त्यांनाच विचारा..
पक्षनेत्यांनी महोत्सवास मान्यता दिल्यानंतर, या महोत्सवासाठी चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी नसल्याने महापौर दत्तात्रय धनकवडे यावर्षी हे महोत्सव होणार नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. त्याबाबत कर्णे गुरुजी यांना विचारले असता, ‘त्यांनाच जाऊन विचारा’ असे त्यांनी पत्रकारांनाच सुनावले.   पुणोकरांच्या पैशाचे विश्वस्त म्हणून तुम्हा हा निर्णय योग्य वाटतो का, असे विचारले असता  महापालिकेत घेतले जाणारे निर्णय सामुदायिक असतात, त्यात माझी एकटय़ाची भूमिका नसते, असे सांगत उत्तर देण्यास नकार दिला.

 

Web Title: Use of great names for the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.