‘तो’ गूळ वापरायोग्य!

By Admin | Published: July 14, 2016 12:44 AM2016-07-14T00:44:11+5:302016-07-14T00:44:11+5:30

गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला... महिला सदस्यांना तरतरी आली... तर एका सदस्याला डोक्यात झटका बसला होता.

Use it 'juggling'! | ‘तो’ गूळ वापरायोग्य!

‘तो’ गूळ वापरायोग्य!

googlenewsNext

पुणे : गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला... महिला सदस्यांना तरतरी आली... तर एका सदस्याला डोक्यात झटका बसला होता. मात्र तो गूळ राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा व फूड हायजेनिक व हेल्थ लॅबोरेटरीने दिलेल्या चाचणी अहवालात वापरायोग्य असल्याचे समोर आले आहे. अजून एक अहवाल येणे बाकी आहे.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीत या दोन्ही अहवालांचा अंतरिम अहवाल सादर करण्यात आला.
जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजारपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये गूळ पावडरचे वाटप करण्यात येते. मात्र, हातभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुळाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब गेल्या महिन्यात जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्र्शनास आणून दिली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी वाटप करण्यात आलेल्या गुळाची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली होती.
या समितीने प्राथमिक पाहणी अहवालात कुठल्याही आरोग्य समस्या मुलांना निार्मण झाल्या नाहीत, तरीही गूळ पावडरचा पुढील वापर प्रयोगशाळेतून अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतरच करावा, असे मत मांडले होते.
राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, फूड हायजिन व हेल्थ लॅबोरेटरी व अन्न व औैषध प्रशासन प्रयोगशाळेत या गुळाचे नमुने पाठविण्यात आले होते. यातील राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेत बारामतीतील अंजनवाडी, हवेलीतील येवलेवाडी येथील नमुने पाठविण्यात आले होते. यात ८ गुणवत्ता निकष तपासण्यात आले असून, अन्नसुरक्षा व प्रमाणके नियमावली २0११ नुसारच्या मापदंडानुसार योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे.
तर फूड हायजिन व हेल्थ लॅबोरेटरीत हवेलीतील येवलेवाडी, बारामतीतील अंजनवाडी व साबळेवाडी येथील नमुने पाठविण्यात आले होते. गूळ पावडरच्या ६ रासायनिक चाचण्यांचे निष्कर्ष मापदंडानुसार योग्य असल्याचे कळविले आहे. (वार्ताहर)

Web Title: Use it 'juggling'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.