पुणे मेट्रोच्या खोदकामात यंत्रांच्या वापरामुळे अन्य काहीच नाही; थेट मातीच हाती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:41 PM2020-11-30T19:41:48+5:302020-11-30T19:42:57+5:30

शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण भुयारी आहे.

The use of machinery in the excavation of the Pune Metro is nothing but; Directly in the hands of the soil | पुणे मेट्रोच्या खोदकामात यंत्रांच्या वापरामुळे अन्य काहीच नाही; थेट मातीच हाती 

पुणे मेट्रोच्या खोदकामात यंत्रांच्या वापरामुळे अन्य काहीच नाही; थेट मातीच हाती 

Next
ठळक मुद्देहत्तीची हाडे डेक्कन महाविद्यालयात

पुणे: मंडईजवळ मेट्रोसाठी खोदकाम करताना हत्तीच्या हाडांचे अवशेष अवघ्या दहा फुटांवर सापडले, मात्र अन्य ठिकाणी जमिनीखाली २८ मीटर खोलीवर जाऊनही काहीच मिळाले नाही. याचे कारण ते खोदकाम यंत्राद्वारे झाल्यामुळे यंत्रातून थेट मातीच हाती येत होती. दरम्यान मंडईजवळ सापडलेले हत्तीचे अवशेष महामेट्रोच्या वतीने डेक्कन महाविद्यालयाच्या पुरात्तत्व विभागात जमा करण्यात आले आहेत.

शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण भुयारी आहे. जमिनीखालून तब्बल २८ ते ३० मीटर अंतरावरून तो आहे. त्याच ५ भुयारी स्थानकेही आहेत. हा बोगदा तयार करतानाही पुणे शहराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता जमिनीत खोलवर काहीतरी सापडेल असा अनेकांचा अंदाज होता, मात्र तसे काहीही झालेले नाही. याचे कारण हे सगळे खोदकाम यंत्राद्वारे झाले असे सांगण्यात येत आहे. यंत्रातून खोदकाम करताना खोदलेल्या भागाची थेट मातीच किंवा अगदी लहान-लहान तुकडे यंत्रातच असणाऱ्या एका सरकत्या पट्टीवर जमा होतात व ते तसेच मागेमागे जात थेट मालमोटारीत जमा होतात. त्यामुळेच या खोदकामात कसलेच अवशेष मिळाले नाहीत, अन्यथा या भागातही नक्कीच काहीतरी मिळाले असते असे आता बोलले जात आहे.
दरम्यान मंडईजवळ खोदकाम करताना सापडलेले हत्तीच्या हाडांचे अवशेष महामेट्रोने डेक्कन महाविद्यालयाला दिले. तेथील पुराजैव शास्त्रज्ञ डॉ. पंकज गोयल यांनी सांगितले की मेट्रोकडून नुकतेच हे अवशेष पाठवण्यात आले. त्यावर आता संशोधन केले जाईल. प्राथमिक अंदाज हे अवशेष १०० ते १५० वर्षांपुर्वीचे आहेत असाच आहे. त्यात काही फरक पडणार नाही, मात्र दुसरे अवशेष कोणत्या प्राण्याचे, त्यांना मरण कशामुळे आले याचा शोध लागेल. तसेच त्या परिसरात आणखी खोदकाम होणार आहे. संबधितांना ते काळजीपूर्वक करण्यात सांगण्यात आले आहे, तसेच आणखी काही सापडले तर त्याची तत्काळ कल्पना द्यावी अशाही सुचना देण्यात अले आहे असे डॉ. गोयल म्हणाले.


टीबीएममधील पडद्यावर पुढे काय आहे ते दिसते
शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम करताना कसलेही अवशेष वगैरे मिळाले नसल्याचे महामेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. अडीच किलोमीटरचा हा भुयारी मार्ग आतील बाजूने सिमेंटचे अस्तर वगैरे करून पूर्ण तयार झाले आहे.
मंडईजवळ खोदकाम करताना अवघ्या १० फूटांवर हत्तीच्या हाडांचे अवशेष सापडले. त्यामुळे आता शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट दरम्यान पुर्ण झालेल्या अडीच किलोमीटर अंतराच्या भुयाराचे खोदकाम करताना काहीच कसे सापडले नाही अशी चर्चा होत आहे. त्याविषयी बोलताना मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे म्हणाले, खोदकाम टनेल बोअरिंग मशिनद्वारे झालेले आहे, त्याच्या कटरने समोरच्या भागाची थेट मातीच होते हे खरे आहे, मात्र यंत्रामध्ये असणाऱ्या मॉनिटरच्या स्क्रिनवर कटरच्या समोर काय आहे ते स्पष्ट दिसते. त्यामुळे ते अडीच किलोमीटरचे खोदकाम करताना काहीच सापडले नाही ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, मंडईजवळचे खोदकाम जेसीबी यंत्रांच्या साह्याने सुरू आहे. फक्त १० फूटांवर अवशेष सापडल्याने तसेच मंडई हा पुण्याचा सर्वाधिक जूना भाग असल्याने हे खोदकाम काळजीपूर्वक करावे अशा सुचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत. सापडलेले सर्व अवशेष त्वरीत डेक्कन महाविद्यालयाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.

Web Title: The use of machinery in the excavation of the Pune Metro is nothing but; Directly in the hands of the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.