बाजार यंत्रणा सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:53+5:302021-08-19T04:15:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाजार यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रचलित पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची ...

Use modern technology for market system empowerment | बाजार यंत्रणा सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

बाजार यंत्रणा सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बाजार यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रचलित पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गरड बोलत होते. मुख्य बाजार, उपबाजार आवारात शेतकरी, बाजार घटकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे काम करणारी माजी सैनिकांची (मेस्को संघटना), सायन व्हिजिलंट सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था यांच्या सेवानिवृत्त जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली.

आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, पूना मर्चंट्स चेबंरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, अप्पा गायकवाड, अरुण वीर, संतोष नांगरे, रांजेद्र चोरगे, अप्पा कोरपे, अमोल घुले, बापू भोसले, राजेंद्र बांठिया, अशोक लोढा, प्रमोद संचेती, बलदेव पंजाबी, राम घाडगे, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.

मधुकांत गरड म्हणाले, शेतकरीबंधूनी मागणीनुसार शेतमालाचे उत्पादन, मालाचा दर्जा, प्रतवारी, टिकाऊपणा, पॅकिंग तसेच माल साठवणुकीसाठी शीतगृहाची आवश्यकता इत्यादीकडे प्राध्यानाने लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

विलास भुजबळ म्हणाले, बाजार समितीच्या इतिहासात बाजार समिती ही कायदाचा बडगा दाखवणारी म्हणून पाहिले जात होते. ते स्वरूप बदलून शेतकरी, बाजार घटकांच्या कला गुणांचे कौतुक या सन्मान सोहळ्यात पहावयास मिळाले याचा आनंद वाटतो.

----

चौकट

शेतकरी, हमाल, तोलणारांचा गौरव

मधुकांत गरड साहेब यांनी बाजार घटकांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी. बाजाराचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी प्रगतशील शेतकरी, आदर्श व्यापारी, गुणवंत हमाल, तोलणार अशा एकूण २७ व्यक्तींना गौरविण्यात आले.

फोटो ओळ : बाजार घटकांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी, तोलणार, हमाल, व्यापारी यांचा गौरव केला. यामध्ये प्रगतशील शेतकरी बापू थोरात यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना प्रशासक मधुकांत गरड.

फोटो - मार्केट

Web Title: Use modern technology for market system empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.