पोषण आहाराऐवजी गोळ्यांचा वापर अधिक: पोवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:10 AM2021-09-19T04:10:24+5:302021-09-19T04:10:24+5:30
कृषी विज्ञान केंद्र बारामती, पंचायत समिती पुरंदर आणि इफको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण ...
कृषी विज्ञान केंद्र बारामती, पंचायत समिती पुरंदर आणि इफको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती प्रकल्पांतर्गत शनिवारी (दि. १८) पुरंदर तालुक्यातील १८५ महिलांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. इफको कंपनीमार्फत १०० महिलांना भाजीपाला बियाणे व शंभर रोपांचे वाटप करण्यात आले. पुरंदर तालुक्यातील नारायणपूर, नारायण पेठ, परिंचे, कोळविहिरे, बहिरवाडी, देवडी, चिलेवाडी,पानवडी इत्यादी गावांतील महिला यामध्ये सहभाग होता. उस्मानाबाद, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ६० सरपंचांचाही या कार्यक्रमास सहभाग होता.
संतोष गोडसे यांनी परसबागेचे महत्त्व व त्यामध्ये लागवड करावयाच्या भाज्यांबाबत माहिती दिली. सर्व महिलांनी केंद्राच्या फॉर्मवरील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यामध्ये शेळीपालन, कुकुटपालन, गाईंचा गोठा, रोपवाटिका, मत्सशेती आदींची माहिती घेतली. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचीही या महिलांसोबत भेट झाली. त्यांनी महिलांची विचारपूस केली, कोणत्या प्रकल्पातून आलात, माहिती मिळतेय का, तुमचे बचत गट आहेत काय? अशी चौकशी केली. महिलांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी एमएसआरएलएमचे तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कुर्डे, तालुका व्यवस्थापक गणेश किकले, कृषी विज्ञान केंद्राचे संतोष गोडसे, यशदाचे शिवाजी बिराजदार, प्रवीण, प्रशिक्षक उपस्थित होते.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास पुरंदर येथील महिलांनी भेट देऊन विविध प्रकल्पांबाबत माहिती घेतली.
१८०९२०२१-बारामती-०१