‘प्री-कुकिंग’ ओल्या कचरा कंपोस्टिंगचा प्रयोग यशस्वी

By Admin | Published: September 22, 2014 05:26 AM2014-09-22T05:26:58+5:302014-09-22T05:26:58+5:30

नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे

The use of 'pre-cooking' wet garbage compost was successful | ‘प्री-कुकिंग’ ओल्या कचरा कंपोस्टिंगचा प्रयोग यशस्वी

‘प्री-कुकिंग’ ओल्या कचरा कंपोस्टिंगचा प्रयोग यशस्वी

googlenewsNext

पुणे : नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ओल्या कचऱ्याचे दोन प्रकारे वर्गीकरण करून अन्न शिजविण्यापूर्वीच्या (प्री-कुकिंग) कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याचा यशस्वी प्रयोग तळजाई येथे करण्यात आला आहे. आद्या इन्व्हायर्नमेंट व वॉर्ड वेस्ट मॅनेजमेंट या सोशल ग्रुपने पी-कुकिंगचा प्रकल्प महापालिकेचे सहआयुक्त
सुरेश जगताप यांच्याकडे नुकताच
सुपूर्त केला.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रक्रिया प्रकल्प व बायोगॅस उभारण्यात आले. परंतु, हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. तसेच, ओला व सुका कचरा वर्गीकरणाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. या परिस्थितीतही ओल्या कचऱ्यामधून प्री-कुकिंगचा कचरा वेगळा करून कंपोस्टिंगचा प्रयोग तळजाई येथे करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप व सहआयुक्त सुरेश जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सहकारनगर परिसरातील सर्व हॉटेल, स्नॅक सेंटर, चौपाटी, पथारी व मंगल कार्यालयातून अन्न शिजविण्यापूर्वी तयार होणारा प्री-कुकिंगचा कचरा गोळा केला जात आहे.
साधारण ४०० किलो प्री-कुकिंग ओल्या पदार्थांचे केवळ २१८ चौरस फूट जागेत कंपोस्टिंग करता येणार आहे. आद्या एन्व्हॉयर्नमेंटचे इंद्रजित कर्वे, वॉर्ड वेस्ट मॅनेजमेंट या सोशल ग्रुपच्या मनीषा दाते, विभा खानापूरकर, ऊर्मिला डाबी, स्वाती कुलकर्णी व निशिगंधा पदमवार यांनी प्री-कुकिंग ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याचा यशस्वी प्रयोग केला. हा प्रकल्प चालविण्याची जबाबदारी महापालिकेचे सूरज कुचेकर व प्रकाश कांबळे यांनी घेतली आहे, असे सुरेश जगताप यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: The use of 'pre-cooking' wet garbage compost was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.