बीव्हीजीकडून विकसित ‘शतप्लस’ रुग्णांसाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:05+5:302021-04-24T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध वापरण्यास कोणताही तोटा नाही. ससून रूग्णालयात करण्यात आलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध वापरण्यास कोणताही तोटा नाही. ससून रूग्णालयात करण्यात आलेल्या प्रयोगात ९६ टक्के लोक बरे झाल्याचे सिद्ध झाले आहे. कर्वे शिक्षण संस्थांमधील ५०० रुग्णांना दिले. एका रूग्णाला ५ दिवस हे औषध पुरते. त्यामुळे आम्ही एसएनडीटी विलीगीकरण कक्षाला देखील ३०० बाटल्या देणार आहोत. मात्र, पहिला रूग्ण आल्यानंतर दहा जणांच्या ५ दिवस चाचण्या केल्या जाव्यात. रूग्ण आल्यानंतर ऑॅक्सिजन पातळी किती होती, संसर्ग किती होता याची नोंद ठेवली जावी. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला तर आम्ही एक लाख बाटल्या, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने (बीव्हीजी) रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी आणि विविध विषाणूजन्य संसर्गाशी लढा देण्यासाठी ‘शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध निर्मित केले आहे. सध्याच्या काळात कोरोना संसर्गाला नियंत्रित करू शकणारे असे हे औषध निरोगी शरीरासाठी आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारकशक्ती संतुलित करणाऱ्या या आयुर्वेदिक औषधाची माहिती देताना बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड म्हणाले, "शतप्लस" हे औषध लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे. हे औषध वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असून, त्यात अँटी आक्सिडेटिव्ह, अँटी इंप्लेमेटरी, अँटी व्हायरल आणि इम्युनो मॉड्युलेटरी हे गुणधर्म आहेत.
कोट
आयुर्वेद आणि नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित शतप्लस चिकित्सेमुळे प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये सार्स कोविड विषाणूच्या संख्येत ९४ टक्के घट दिसून आली आहे. उपचारांच्या पहिल्या ४ दिवसांतच ७३ टक्के, सातव्या दिवशी ९६.७ टक्के, तर उपचाराच्या दहाव्या दिवशी शंभर टक्के शतप्लस उपचार गटातील रूग्णांना फायदा झाला आहे.
हणमंतराव गायकवाड, संस्थापक, बीव्हीजी लाईफ सायन्सेस
-----------------------