पाणी जपून वापरा: आढारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:41+5:302020-12-14T04:27:41+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील चिखली येथे पिण्याचे पाण्याचे वर्षानुवर्षे असणारे संकट विचारात घेऊन रोटरी क्लब ऑफ सिंहगड ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील चिखली येथे पिण्याचे पाण्याचे वर्षानुवर्षे असणारे संकट विचारात घेऊन रोटरी क्लब ऑफ सिंहगड व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या वतीने मोठे पिण्याच्या पाण्याचे कुंड बांधण्यात आले ह्या कुंड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी आढारी बोलत होते. यावेळी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन, शिवाजी टाकळकर, रवींद्र वाजगे, सुकाजी मुळे, उर्मिला वाजगे, माजी जि.प सदस्य विजय आढारी , आदर्श सरपंच अनिता आढारी उपसरपंच धर्मा आढारी पोलीस पाटील गणेश आढारी आदी उपस्थित होते.
आढारी म्हणाले, तालुक्याचा पश्चिम भाग हा मुसळधार पडणार्या पावसाचे माहेरघर समजला जातो पावसाळ्यामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडुनही उन्हाळ्यात आदिवासी भागातील आदिवासी माता भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागते या साठी भविष्यातील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता पाण्याचा जपुन वापर करावा असा सल्ला आढारी यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव थोरात व आभार शिवाजी टाकळकर यांनी मानले.
१३ तळेघर