व्हॉट्स अ‍ॅपचा असाही वापर

By admin | Published: September 18, 2016 12:36 AM2016-09-18T00:36:30+5:302016-09-18T01:11:25+5:30

प्रत्येक माणसाचे प्रत्येक माणसाशी न ओळखताही एक अतूट नाते असते, त्याचेच नाव माणुसकी. याच नात्याची प्रचिती बालेवाडी येथे पाहावयास मिळाली.

Use of the Whatsapp app too | व्हॉट्स अ‍ॅपचा असाही वापर

व्हॉट्स अ‍ॅपचा असाही वापर

Next

मरे यांचे आवाहन: लाखांदूर येथील स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,
लाखांदूर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्टार्ट उप इंडियाच्या संकल्पनेतून विकास करण्याच्या दृष्टीने युवकांसाठी कौशल विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र उघडले. प्रशिक्षण देणे सुरु असल्याने युवकांनी कौशल विकासाचा लाभ घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनून दुसऱ्यांना नोकऱ्या द्या, असा मार्मिक आवाहन जिल्हा कौशल विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सह संचालक मरे यांनी केले. ते लाखांदूर येथे आयोजित स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते.
भारतीय युवा बहुउद्धेशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था बारव्हाच्या विद्यामाने लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात भव्य स्वयंरोजगार मार्गदर्श मेळाव्याचे आयोजन आज शनिवारला करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मधुसूदन धारगावे, यांचे हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेश चुन्ने यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कौशल विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सह संचालक मरे, मदन खडसे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, एस.पी.बावनकर, जिल्हा व्यवस्थापक, म.रां.ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, सोनकुसरे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा, जिल्हा अग्रणी बँकेचे बागडे, कल्पना भोंगाडे संत रोहिदास चार्मोद्धोग व चर्मकार महामंडळ भंडारा प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सह संचालक मरे म्हणाले, युवा पिढीला चांगले प्रशिक्षण मिळाले पाहिजे युवकांनी आपल्यात कौशल्य निर्माण करण्याची गरज आहे असे सांगताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रमोद महाजन कौशल विकास योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या द्वारे नवीन उद्योजक तयार करण्याचा प्रयत्न सुरु असून फेब्रुवारी २०१६ पर्यंत जवळपास बाराशे युवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. नवनवीन कंपन्यांना मनुष्यबळ पाहिजे आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे मदन खडसे म्हणाले, युवकांनी आपल्यातला उद्योजक जागा केला पाहिजे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनेक योजनांना निधीचा पुरवठा केला जातो. मात्र प्रथम आपण काय केले पाहिजे हे ठरविणे महत्वाचे आहे. यावेळी सोनकुसरे, कल्पना भोंगाडे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक धारगावे म्हणाले, मागासवर्गीय घटकाचा विकास करणे समाजकल्याण विभागाची जबाबदारी आहे. युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेती ही व्यापारी दृष्टिकोनातून केली पाहिजे. युवकानो तुमच्या कष्टावरच तुमचे यश अवलंबून असल्याचे मत धारगावे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश चुन्ने यांनी, सुशिक्षित बेरोजगारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असून अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक, कृषी विभाग, समाजकल्याण विभाग अशा विविध विभागाचे स्टाल लाऊन युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. जवळपास सहाशेच्या वर युवक, युवती तसेच सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी यांनी या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिलमंजू सिव्हगडे यांनी केले. संचालन प्रकाश हेमने यांनी केले. तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. मोहन राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किरण सातव, ऋषी गोमासे, बाबुराव भिषे, प्रशांत सोनवणे, राकेश लाडे, मनोज बडोले, ललित दानी, लीलाधर शिवरकर, राहुल हर्षे, संदीप लोंढे,रवी झोडे, कैलाश रामटेके, पुंडलिक शेंडे यांनी सहकार्य केले.
यावेळी तालुक्यातील युवक यवुतींची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Use of the Whatsapp app too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.