दिल्लीहून विमानाने यायचे आणि घरफोड्या करून परत जायचे; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 10:35 AM2023-08-12T10:35:19+5:302023-08-12T10:35:50+5:30

घरफोडी करणाऱ्या दोघांना अखेर कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले...

used to come by plane from Delhi and return after breaking into houses; Both were arrested | दिल्लीहून विमानाने यायचे आणि घरफोड्या करून परत जायचे; दोघांना अटक

दिल्लीहून विमानाने यायचे आणि घरफोड्या करून परत जायचे; दोघांना अटक

googlenewsNext

पुणे : विमानाने दिल्लीहून पुण्याला यायचे टेहाळणी करून घरफोड्या करायचे आणि पुन्हा विमानाने दिल्लीला जायचे. अशी हवाई यात्रेद्वारे घरफोडी करणाऱ्या दोघांना अखेर कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. रिझवान अजमत अली (वय ३२, राजीवनगर, दिल्ली आणि ईकरार नसीर अहमद (२७, अमरोहा, उत्तर प्रदेश) अशी या चोरट्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी दुपारी अडीच ते पावणे चारच्या सुमारास कोंढवा येथील रहिवासी रवींद्र हनुमंत बटरके (५०) यांचे आणि किरण अविनाश होळकर यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर भोसले, अनिल बनकर तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम गोकुळनगर येथील रहिवासी भागामध्ये संशयितरीत्या टेहाळणी करत आहेत, तसेच वॉचमन नसलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन देखील पाहणी करत आहेत.

या माहितीनंतर उपनिरीक्षक पाटील यांनी अन्य पोलिस सहकाऱ्यांना सोबत घेऊन गोकुळनगर परिसरात गेले. तेथे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली. या परिसरात येण्याचे कारण त्यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पाहणी केली. त्यामध्ये त्यांचे वापरते कपडे दिसून आले. कपड्यांच्या खाली एक हिरव्या रंगाचा प्लास्टिकची मूठ असलेला स्क्रू ड्रायव्हर व एक लहान आकाराचे कटर आढळून आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून दिल्ली येथे जाऊन चोरीस गेलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त परिमंडळ-५ शाहूराजे साळवे, सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस हवालदार सतीश चव्हाण, नीलेश देसाई, पोलिस नाईक गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, पोलिस अंमलदार लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सूरज शुक्ला, अनिल बनकर आणि ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने केली.

Web Title: used to come by plane from Delhi and return after breaking into houses; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.