पुन्हा पुन्हा तळणासाठी एकच तेल वापरणे घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:03+5:302021-09-24T04:11:03+5:30

पुणे : तळणासाठी वापरलेले एकच तेल अनेकदा वापरले, तर त्याचे घातक परिणाम खाद्यपदार्थ खाणाऱ्यांवर होतात. त्यामुळे एकदा वापरलेले तेल ...

Using the same oil for repeated frying is dangerous | पुन्हा पुन्हा तळणासाठी एकच तेल वापरणे घातक

पुन्हा पुन्हा तळणासाठी एकच तेल वापरणे घातक

Next

पुणे : तळणासाठी वापरलेले एकच तेल अनेकदा वापरले, तर त्याचे घातक परिणाम खाद्यपदार्थ खाणाऱ्यांवर होतात. त्यामुळे एकदा वापरलेले तेल पुन्हा -पुन्हा वापरू नये. जर अशा सतत वापरलेल्या तेलातील खाद्यपदार्थ खाल्ले तर हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. तसेच इतरही आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे कोणी सतत तेल वापरत असेल, तर त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करावी.

एकच तेल पुन्हा वापरल्यास त्यात हायड्रोकार्बन तयार होतात. ते लठ्ठपणा आणि मधुमेहाला निमंत्रण देऊ शकते. तसेच किडनीलाही धोकादायक ठरते. त्यामुळे तळलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरणं टाळले पाहिजे. तेलाच्या वापराबाबत फूड्स सेफ्टी अँड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI)नं मार्गदर्शक तत्त्वं जारी केलीत. वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणं चांगलं नसल्याचं FSSAIनं म्हटलंय.

आहारतज्ज्ञ डॉ. तेजस लिमये म्हणाल्या, ‘बऱ्याचदा तळण्यासाठी लोखंडी कढई वापरली जाते. त्यातील लोहाची तेलाबरोबर रिॲक्शन होऊन इतर काही घातक घटक तेलात उतरतात. ट्रान्स फॅट्स व या इतर घटकांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता देखील वाढते. तसेच तेल पुन्हा पुन्हा तापवून वापरले तर ते घट्ट होते आणि असे तेल खाद्यपदार्थ जास्त शोषून घेतात. यामुळे जास्त तेल पोटात जाते. या सगळ्यांचा विचार करता शक्यतो एकच तेल पुन्हा पुन्हा वापरू नये.’

—————————————

घरामध्ये तळणाला वापरलेले तेल पुन्हा वापरायचे असेल, तर ते गाळून पोळीला लावण्यासाठी किंवा फोडणीसाठी वापरता येईल. तसेच असे तेल जास्त गरम करू नये. तळणासाठी लोखंडी कढईपेक्षा अल्युमिनियमची कढई वापरावी.

- डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ

———————

पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलाने आजारांना निमंत्रण

रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविणाऱ्या गाड्यांवर अनेकदा एकच तेल सतत वापरले जाते. त्यामुळे तेलाचे जे स्ट्रक्चर असते, ते बदलते. आपण खूप जास्त तापमानाला (तेलातून वाफा येईपर्यंत) तेल गरम केले तर त्यातील सूक्ष्म घटकही बदलतात आणि त्यात ट्रान्स प्रकारचे फॅट्स तयार होतात. हे ट्रान्स फॅट्स आपल्या हृदयासाठी खूप घातक असतात. त्यांच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साठून राहण्यास सुरुवात होते, असे आहारतज्ज्ञ डॉ. तेजस लिमये यांनी सांगितले.

—————————————

तथ्य आढळल्यास संबंधितांवर खटला

एकच तेल सतत वापरत असतील तर त्याबाबत आमच्याकडे कोणी तक्रार केली, तर आमची टीम तिथे जाऊन तपासणी करते. त्या तेलाचे सॅम्पल घेऊन लॅबला पाठवते. लॅबकडून रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर खटला दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना योग्य ती शिक्षा केली जाते.

शिवाजी देसाई, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

—————————————

Web Title: Using the same oil for repeated frying is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.