भोसे येथे ‘उत्सव बाप्पाचा जागर वाचनाचा’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:35+5:302021-09-18T04:11:35+5:30

भोसे येथे लोकवर्गणीतून स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक ग्रंथालयाचे काम प्रगतिपथावर आहे. विशेष म्हणजे इमारत उभारणीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने विनामोबदला जागा उपलब्ध ...

‘Utsav Bappacha Jagar Vachanacha’ at Bhose | भोसे येथे ‘उत्सव बाप्पाचा जागर वाचनाचा’ उपक्रम

भोसे येथे ‘उत्सव बाप्पाचा जागर वाचनाचा’ उपक्रम

Next

भोसे येथे लोकवर्गणीतून स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक ग्रंथालयाचे काम प्रगतिपथावर आहे. विशेष म्हणजे इमारत उभारणीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली असून, भरीव मदतही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाचनालयाच्या कामाला अधिक गती मिळावी, या उद्देशाने मयूर कुटे यांनी आपल्या घरगुती बाप्पासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक ग्रंथालयाची प्रतीकात्मक इमारत साकारली असून, तरुणाईला सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तके वाचनाचा छंद जोपासण्याचे आवाहन करत आहे.

दरम्यान, भोसे गावात मयूर कुटे यांनी सन २०१० साली गावातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जुन्या मराठी शाळेत वाचनालय सुरू केले आहे. प्रारंभी ३०० पुस्तकांपासून सुरू झालेला हा प्रवास गावातील व परिसरातील वाचनप्रेमींच्या सहकार्याने सध्या तीन हजारांहून अधिक दर्जेदार पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे.

१७ शेलपिंपळगाव

भोसे (ता. खेड) येथे गणरायासमोर ग्रंथालयाची प्रतीकात्मक इमारत साकारली आहे.

Web Title: ‘Utsav Bappacha Jagar Vachanacha’ at Bhose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.