वाबळेवाडी देशातील पहिली झीरो-एनर्जी शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:12 AM2018-02-23T01:12:31+5:302018-02-23T01:12:42+5:30

पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने आता देशातही नावलौैकिक मिळविला आहे.

Vabalewadi is the first zero-energy school in the country! | वाबळेवाडी देशातील पहिली झीरो-एनर्जी शाळा!

वाबळेवाडी देशातील पहिली झीरो-एनर्जी शाळा!

googlenewsNext

शिक्रापूर : पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने आता देशातही नावलौैकिक मिळविला आहे. आता ती देशातील पहिला झीरो-एनर्जी शाळा झाली आहे.
ग्रामस्थांची साथ, शिक्षकांचे अथक परिश्रम व त्याला समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची जोड मिळाली, की काय कायापालट होऊ शकतो, याचे ही शाळा एक उत्तम उदाहरण आहे. बँक आॅफ न्यूयॉर्कच्या मदतीमुळे वर्षभरापूर्वी बांधायला सुरू केलेल्या ८ झीरो-एनर्जी क्लासरूम नुकत्याच तयार झाल्या असून, ही परदेशातील एखादी हायटेक शाळा तर नव्हे ना, असे वाटते आहे.
या शाळेने ५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्याला चकित केले होते. स्थानिक ग्रामस्थांची एकसारखी प्रेरणा हेच ते काय बळ असलेल्या या शाळेला राज्य सरकारने इंटनॅशनल स्कूलमध्ये वर्गीकृत करून या शाळेत ‘पिसा’ अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. तो येत्या जूनपासून सुरू होतोय. शाळेच्या दर्जात्मक कामाची दखल घेऊन मागील मार्चमध्ये अमेरिकेची ट्रेझरी-बँक बँक आॅफ न्यूयॉर्कने आठ वर्गखोल्या उभ्या करून देण्यासाठी अर्थसाह्य केले ते आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून.
या बांधकामात नवीन प्रकारच्या पूर्णत: काचेच्या २२ फूट रुंद, २२ फूट लांब तसेच १४ फूट उंचीच्या ८ वर्गखोल्या पूर्ण पर्यावरणपूरक आहेत. पॉलिकार्बोनेट व टेनसाईल मेंब्रेन यांचे द्विस्तरीय छत, टफन ग्लासच्या भिंती (१,५०० अंश सेल्सिअस तापमानाला या काचेचे मजबुतीकरण केले जाते) असे या प्रत्येक रूमचे बांधकाम असून चारही बाजूंनी ५ फुटांचे पन्हाळ छत प्रत्येक वर्गाला उभे केले आहेत. छताचा पहिला स्तर टेन्साईल मेंब्रेनचा (निरुपयोगी प्लॅस्टिकपासून बनविलेले मटेरियल) असून त्यामुळे प्रकाश स्वीकारणे व उष्णता परिवर्तित हे दोन्ही साध्य होते. त्याखालील स्तर हा पॉलिकार्बनचा असून पॉलिकार्बनच्या रासायनिक संरचनेमुळे प्रकाशाचे विस्तारीकरण होत असल्याने थंड, उल्हसित व उबदार प्रकाश प्रत्येक वर्गखोलीला मिळत आहे. त्यामुळे झाडाखाली मिळणाºया सावलीसह खेळती हवा दोन्ही खोल्यांमध्ये मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व उपशिक्षक एकनाथ खैरे यांनी दिली. याच आठही वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असून, तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून कळविण्यात आल्याची माहिती वारे यांनी दिली.
 

Web Title: Vabalewadi is the first zero-energy school in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.