दिवसाला सरासरी साडेआठ हजार लोकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:16+5:302021-04-18T04:11:16+5:30
पुणे : शहरात एकीकडे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर, दुसरीकडे लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावलेला ...
पुणे : शहरात एकीकडे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर, दुसरीकडे लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. १६ जानेवारी रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. १५ एप्रिलपर्यंत ६ लाख ३० हजार ३०२ जणांना लस देण्यात आली आहे. या ७५ दिवसाची सरासरी काढल्यास दिवसाकाठी साडेआठ हजार नागरिकांना लास दिली गेली आहे.
राज्य शासन आणि पालिकेने शहरात ''वीकेंड लॉकडाऊन'' लागू केलेला आहे. यासोबतच संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. या काळात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु, लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. सर्व केंद्रांवर लस पुरवठा होत नसल्याने ही केंद्र बंद ठेवावी लागते आहेत. शनिवारीही दिवसभरातील १७ केंद्र बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी परत जावे लागले. केंद्र बंद असल्याची कोणतीही पूर्व कल्पना नागरिकांना दिली जात नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
------
पालिकेने १६० लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. यातील १५ ते २० केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. शनिवारी दिवसभरात १४ हजार ३६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शनिवारी पालिकेला ३० हजार कोविशिल्ड तर ५ हजार कोव्हॉक्सिनचा साठा प्राप्त झाला आहे. हा साठा तीन ते चार दिवस पुरेल.
------
आजवरच्या लसीकरणाची आकडेवारी
प्रकार। उद्दिष्ट। पहिला डोस। दुसरा डोस। एकूण
आरोग्य सेवक : ५६,०००। ५६,२७१। ३८,८५६
फ्रंटलाईन सेवक। ५७,२६४। ५३,८६५। १३,२९२
-----
वयोगटानुसार लसीकरण
वय। पहिला डोस। दुसरा डोस
४५ वर्षे ते ५९ वर्षे। २,०५,६४२। ४,८८४
६० वर्षे व त्यापुढील : २, ४२, ७२०। १४,७७२
-----