अतिवृद्धांना जागेवरच लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:49+5:302021-04-28T04:11:49+5:30
नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वतः लक्ष देऊन येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्रात लसीकरण करून घेत आहेत. लसीकरण ...
नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वतः लक्ष देऊन येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्रात लसीकरण करून घेत आहेत. लसीकरण मोहीम चालू असताना असेच एक वयोवृद्ध नागरिक आले होते. त्यांना नाना यांनी जागेवर लस उपलब्ध करून दिली. लसीकरणाच्या आवारात ते चारचाकी वाहनांतून आले. परंतु त्यांना गाडीतून उतरून केंद्रात जाण्यास त्रास होत होता. त्यामुळे आरोग्य कमर्चारी व नाना यांनी त्यांच्या गाडीजवळ जाऊन त्यांना लस दिली.
आठ दिवस झाले या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. महम्मदवाडी येथील कै. दशरथ बळीबा भानगिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकऱण सुरू आहे. तेथे गर्दी होत असल्यामुळे भानगिरे यांनी विरंगुळा केंद्रामध्ये लसीकरण केंद्राची मागणी केली होती. त्यानंतर तेथे लसीकऱण सुरू करण्यात आले. दररोज सुमारे १०० लोकांना लस दिली जात आहे. गेल्या आठ दिवसांत सुमारे ५०० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली.
ज्यांना चालता फिरता येत नाही. परंतु त्यांना लसीकऱण केंद्रापर्यंत गाडीने जाऊ शकतात. त्यांना तेथच लस दिली पाहिजे. त्यामुळे त्यांना होणारा त्रास कमी होईल, असे मत भानगिरे यांनी व्यक्त केले.