वारकऱ्यांना लसीकरण करा, मात्र दिंडी सोहळा होऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:09 AM2021-05-27T04:09:57+5:302021-05-27T04:09:57+5:30
गेल्या वर्षी कोरोनामुळे दिंड्यांचे आगमन झाले नाही, तालुक्यात तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत, वरवंड मुक्कामी असतो तर ...
गेल्या वर्षी कोरोनामुळे दिंड्यांचे आगमन झाले नाही, तालुक्यात तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत, वरवंड मुक्कामी असतो तर भांडगाव, चौफुला, पाटस, रोटी, वासुंदे या ठिकाणी भाविक मोठ्या जल्लोषात दिंडी सोहळ्याचे स्वागत करीत असतात. तेव्हा हा उत्साह पाहता भाविकांच्या आनंदावर शासनाने विरजण घालू नये नुकत्याच पाच राज्यांत निवडणुका झाल्या. या वेळी तेथील जल्लोष, प्रचाराच्या जाहीर सभा, रॅली यावर निर्बंध नव्हते या पाचही राज्यांत कोरोना नव्हता का? मग महाराष्ट्रातील पालखी सोहळ्यावर निर्बंध कशासाठी लावता? शासनाने, पालखी सोहळ्यासाठी निर्बंध ठेवू नये. परिणामी, दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचे लसीकरण करून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी यासाठी शासनाने दिंडी सोहळा प्रमुखांसह वारकऱ्यांना नियम घालून द्यावेत. मात्र, यावर्षी दिंडी सोहळा परंपरेनुसार सुरू ठेवावा असे शेवटी पंढरीनाथ पासलकर म्हणाले.