खेड तालुक्यात १ लाख ९ हजार १३५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:05+5:302021-05-30T04:09:05+5:30
आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचे ३०८८ प्रथम डोस, तर १७९१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्करांचा १२९७६ ...
आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचे ३०८८ प्रथम डोस, तर १७९१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्करांचा १२९७६ जणांचा पहिला, तर ३३२७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वयापुढील ३६ हजार २९८ नागरिकांचा पहिला डोस, तर अवघ्या ६ हजार ५५६ ज्येष्ठांचा दुसरा डोस झाला आहे.४५ ते ५९ वयोगटातील ३८ हजार ७३३ जणांचा पहिला डोस होऊन पैकी अवघ्या ४ हजार ८८५ नागरीकांना दुसरा डोस तारेवरची कसरत करुन मिळाला आहे. १ मेपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या १८ ते ४४ वयोगटाच्या तिसऱ्या टप्यात तर बाहेरील नागरिकांनी लसीकरण करून घेतले. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कोरोना फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरल्याने ७ मेपर्यंत प्रत्येक केंद्रात दररोज १०० डोस याप्रमाणे सातशे डोसेस उपलब्ध करुन देण्यात आहे. त्यानंतर लसीचा खडखडाटच झाला तो अद्यापही सावरला नसल्याचे दिसून येते. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील आज अखेर फक्त १४८१ तरुणांचे लसीकरण झाले आहे.