राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केद्रांत ११ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:41+5:302021-05-01T04:09:41+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत राजगुरुनगर शहरातील ५ हजार ४७१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर आरोग्य केंद्राच्या हद्दीतील १९ ठिकाणी ५ ...
प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत राजगुरुनगर शहरातील ५ हजार ४७१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर आरोग्य केंद्राच्या हद्दीतील १९ ठिकाणी ५ हजार ६९१ व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले आहे. तिन्हेवाडी ६५०, शिरोली ८९९, टाकळकरवाडी ३२५, राक्षेवाडी ३९२, सातकरस्थळ पश्चिम ४१६, ढोरेभांबुरवाडी २६२, मांजरेवाडी ४६१, पाडळी ३३०, होलेवाडी २८५, रोहकल १५०, शिरोली ३२२, कोहिनकरवाडी १७०, भाम ३१२, बुट्टेवाडी २०३, जैदवाडी ३८, वाकी बुद्रुक १८० या ठिकाणी लसीकरण कार्यक्रम घेऊन कोरोना लसीकरण करण्यात आले.
१ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असल्याने केंद्रावर मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे त्याअगोदर लसीकरण करण्यासाठी ४५ वर्षांपुढील नागरिकांनी गर्दी केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध होईल तसे लसीकरण केले जाणार असून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्स व मास्कसह सर्व नियम पाळावेत असे आरोग्य विभागाकडून आवाहन केले आहे. असे डॉ. पूनम चिखलीकर यांनी सांगितले, राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. एक मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी नियोजन केले आहे. शहरातील दोन ठिकाणी लसीकरण घेतले जाणार आहे. महिला आणि पुरुष असे या केंद्रावर स्वतंत्र कक्ष करण्याचा प्रयत्न आहे.