कुरुळी केंद्रात १११५ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:22+5:302021-04-10T04:10:22+5:30
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध म्हणून शासनाच्या माध्यमातून लसीकरण सुरु आहे. ४५ वर्षापुढील ...
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध म्हणून शासनाच्या माध्यमातून लसीकरण सुरु आहे. ४५ वर्षापुढील नागरिकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून लसीकरण केले असून
कुरुळी आरोग्य केंद्र येथे एक एप्रिल पासून लसीकरण सुरू असून सुरुवातीला लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला, मात्र लसीकरण सुरक्षित असल्याचे प्रबोधन केल्याने नागरिकांनी सहकार्य केले.
या लसीकरण शिबिरासाठी करंजविहिरे येथील वैधकीय अधिकारी डॉ जयश्री महाजन, आरोग्य अधिकारी डॉ सारिका लहामटे,डॉ स्मिता गाढवे, ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल, सरपंच शिल्पा सोनवणे, उपसरपंच सागर मुऱ्हे, आरोग्य सेवक प्रशांत सोनवणे, रुपाली जाधव, आशा गोसावी, आरती कांबळे, सुषमा कांबळे, सोनल मुऱ्हे, शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी लसीकरणास यांचे सहकार्य लाभले.
डोस दिल्यानंतर काही लोकांना ताप, अंगदुखी, अशी सौम्य लक्षणं दिसून आली हा त्रास होऊ नये यासाठी लस दिल्यानंतर लाभार्थींना दोन दिवसांच्या गोळ्या देऊन अर्धा तास विश्रांती नंतर घरी सोडले असे डॉक्टरांनी सांगितले,
--
फोटो क्रमांक - ०९कुरुळी लसीकरण
फोटो ओळ: कुरुळी उपकेंद्रात लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी
विजय मु-हे कुरूळी वार्ताहर
9822083913