आज दोनच केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटासाठी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:29+5:302021-05-11T04:11:29+5:30
पुणे : राज्य शासनाकडून लसपुरवठा न झाल्याने, शहरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मंगळवारी (दि. ११) दोनच केंद्रांवर ...
पुणे : राज्य शासनाकडून लसपुरवठा न झाल्याने, शहरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मंगळवारी (दि. ११) दोनच केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले आहे. राजीव गांधी रुग्णालय येरवडा व कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ या ठिकाणी प्रत्येकी ५०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत़
दरम्यान, या दोन्ही केंद्रांवर केवळ कोविशिल्ड उपलब्ध राहणार असून, अपॉइंटमेंट/स्लॉट बुकिंगची सुविधा सोमवारी रात्री ८ वाजता सुरू झाल्याने केवळ बुकिंग असणाऱ्या नागरिकांनाच येथे लस दिली जाणार आहे़ त्यामुळे नावनोंदणी न केलेल्या नागरिकांनी थेट लस घेण्यासाठी या ठिकाणी जाऊ नये, त्यांना लस मिळणार नाही, असे देखील महापालिकेने कळविले आहे़
------------------
४५ वर्षांवरील नागरिकांना ५० केंद्रांवर लस
मंगळवारी शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मंगळवारी ५० केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात ४० केंद्रांवर कोविशिल्ड तर १० केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे़ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणाऱ्या १० केंद्रांवर १३ एप्रिल २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल.
तर कोविशिल्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर २७ मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे़ तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या २० टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे.
अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या २० टक्के नागरिकांसाठी त्यांचे नावे लसीचे डोस राखीव ठेवण्याबाबत लसीकरण केंद्रांना आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत़ यामुळे या सर्व लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी पुरविण्यात आलेल्या १०० डोसपैकी २० डोस हे आॅनलाईन बुकिंग करून अपॉइंटमेंट घेतलेल्यांना दिले जाणार आहेत़
------------------------