दिवसभरात २० हजार ४२५ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:49+5:302021-06-16T04:12:49+5:30

पुणे : लसीच्या दुसऱ्या डोसकरिता असलेली ८४ दिवसांची अट, ऑनलाईन पोर्टलवर नोंद न होणे आदी कारणांमुळे आज खासगी रुग्णालयांसह ...

Vaccination of 20 thousand 425 people in a day | दिवसभरात २० हजार ४२५ जणांचे लसीकरण

दिवसभरात २० हजार ४२५ जणांचे लसीकरण

Next

पुणे : लसीच्या दुसऱ्या डोसकरिता असलेली ८४ दिवसांची अट, ऑनलाईन पोर्टलवर नोंद न होणे आदी कारणांमुळे आज खासगी रुग्णालयांसह महापालिकेच्या १६८ केंद्रांवर लस उपलब्ध असूनही, दिवसभरात २० हजार ४२५ जणांचे लसीकरण होऊ शकले.

९ जूनला महापालिकेचे ९९ केंद्र (सेशन) चालू असतानाही शहरात २३ हजार ७४१ जणांचे लसीकरण झाले असताना सोमवारी हा आकडा त्यापेक्षाही कमी दिसून आला. महापालिकेने सोमवारकरिता १६८ केंद्रांवर प्रत्येकी १०० लसींचे डोस पुरविले होते़ मात्र, लसीच्या दुसऱ्या डोसकरिता ८४ दिवसांची अट पूर्ण न होऊ शकणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अनेकांना इच्छा असूनही लस घेता आली नाही़ शहरात आतापर्यंत एकाच दिवशी म्हणजे ३ जून रोजी सर्वाधिक म्हणजे ३० हजार ६२४ जणांचे लसीकरण झाले आहे़ यामध्येही सर्वाधिक लसीकरण हे १८ ते ४४ वयोगटातील तेही खासगी रुग्णालयांमध्ये झाले असून, हा आकडा १९ हजार ३७० इतका आहे़

दरम्यान, सोमवारी दिवसभर खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील ११ हजार ३३३ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे़

---------------------------

Web Title: Vaccination of 20 thousand 425 people in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.