परदेशात जाणाऱ्या २२० विद्यार्थ्यांचे मंगळवारी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:25+5:302021-06-02T04:09:25+5:30
पुणे : पुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या २२० विद्यार्थ्यांचे मंगळवारी लसीकरण करण्यात आले़ महापालिकेने परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या ...
पुणे : पुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या २२० विद्यार्थ्यांचे मंगळवारी लसीकरण करण्यात आले़ महापालिकेने परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाचा अडथळा येऊ नये म्हणून या विशेष मोहिमेचे आयोजन केले असून, त्याला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे़
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे़ महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील ५ व्या मजल्यावरील लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस उपलब्ध आहे़
या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी २२० जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, बुधवारी (२ जून रोजी) ५०० जणांचे लसीकरण केले जाणार आहे़ आत्तापर्यंत महापालिकेकडे परदेशात जाणाऱ्या शहरातील दीड हजार विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी अर्ज केला आहे़ या सर्वांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले़
-------------------------