मुळशीत २४ हजार ७२९ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:37+5:302021-04-08T04:10:37+5:30
तालुक्यातील मुख्य पौड आरोग्य रुग्णालय व माण आरोग्य केंद्र तसेच आता या लसीकरण कामासाठी भुकूम, सूस, उरवडे, बावधन, घोटवडे, ...
तालुक्यातील मुख्य पौड आरोग्य रुग्णालय व माण आरोग्य केंद्र तसेच आता या लसीकरण कामासाठी भुकूम, सूस, उरवडे, बावधन, घोटवडे, कोळवण अंबडवेट, मुळशी, नेरे या ९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरणाची विशेष सोय केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण करणे सोयीचे झाले. जिल्ह्यात पुणे जिल्हा रुग्णालय औंध, पुणे कटक मंडळ खडकी, कटक मंडळ देहू व आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर,
खेड ,मावळ ,मुळशी ,पुरंदर ,शिरूर ,वेल्हा याठिकाणी लसीकरण सुरू आहे.
एकूण लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्या १७,४१,८१२आहे, मुळशी तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर विशेष मेहनत घेत आहेत, तसेच डॉ. वैशाली पाटील पिरंगुट, उत्तम गायकवाड बावधन, श्रीमती मते कोळवण, श्रीमती शेटे माले, राऊत सुस, दीपाली कांबळे घोटवडे ,सोनाली पात्रिकर नेरे इत्यादी आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती मुळशीचे कर्मचारी, अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी व महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा प्राथमिक शिक्षक हे मोलाचे सहकार्य करत आहेत व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाची बाजी लावताना दिसत आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कारंजकर यांनी दिली