जिल्ह्यात २५ लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:11+5:302021-05-20T04:12:11+5:30

अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण : साथ रोखायची असेल तर वाढवावा लागेल वेग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ...

Vaccination of 25 lakh citizens in the district | जिल्ह्यात २५ लाख नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात २५ लाख नागरिकांचे लसीकरण

Next

अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण : साथ रोखायची असेल तर वाढवावा लागेल वेग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सर्व मिळून २५ लाख १५ हजार ८९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात झालेले लसीकरण सर्वाधिक आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ८५ हजार ६२३ जणांचे, तर सोलापूर जिल्ह्यात ४ लाख ७८ हजार ६२८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील अडीच लाख नागरिकांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील ५० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ ते ६० हा वयोगट आणि १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटाचाही लसीकरणात समावेश करण्यात आला आहे. मात्र लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने गेल्या पाच महिन्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढवल्यास आणि पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास नियोजनबद्ध पद्धतीने कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर द्यायला हवा, असे वैद्यकतज्ञांचे म्हणणे आहे.

१६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे सुरुवात झाली. या प्रक्रियेला आता चार महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही १००% आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. पुणे जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 455 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी एक लाख 34 हजार 402 आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस तर 85 हजार दहा आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे.

सर्वसामान्य नागरिकांपैकी 60 वर्षावरील सात लाख 70 हजार 143 नागरीकांचा पहिला डोस तर 2 लाख 68 हजार 52 ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. 45 ते 60 या वयोगटातील आठ लाख 6 हजार 778 नागरिकांचा पहिला डोस तर 1 लाख 34 हजार 138 नागरिकांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे.

----

लसीकरण आकडेवारी :

आरोग्य कर्मचारी :

नोंदणी पहिला दुसरा

डोस डोस

ग्रामीण 61451 48734 24480

पुणे 82142 59009 45871

पिं-चिं 38862 26659 14959

---------------------------------------------------------

एकूण 182455 134402 85010

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी :

पहिला दुसरा

डोस डोस

ग्रामीण 87635 37416

पुणे 67519 24696

पिंपरी-चिंचवड 34844 12167

---------------------------------------------------------

एकूण 189998 74279

४५ ते ६० वर्षे वयोगट : -

पहिला दुसरा

डोस डोस

ग्रामीण 367798 57666

पुणे 276699 51118

पिं-चिं 162291 28354

---------------------------------------------------------

एकूण 806788 137138

६० वर्षांवरील नागरिक :

पहिला दुसरा

डोस डोस

ग्रामीण 378513 83951

पुणे 273311 129443

पिं-चिं 118319 54658

---------------------------------------------------------

एकूण 770143 268052

१८ ते ४४ वयोगट

पहिला

डोस

ग्रामीण 18453

पुणे 18514

पिं-चिं 13122

---------------------------------------------------------

एकूण 50,089

Web Title: Vaccination of 25 lakh citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.