जिल्ह्यात अडीच लाख ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:18+5:302021-03-24T04:10:18+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाबरोबरच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरणही पूर्ण केले जात आहे. आतापर्यंत ...
सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाबरोबरच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरणही पूर्ण केले जात आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ९०.७ टक्के आरोग्य कर्मचारी, ८५.३ टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. चारही टप्प्यांतील मिळून ५,२०,९५८ नागरिकांचे लसीकरण पार पडले आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये २६७ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी पुणे ग्रामीणमध्ये १२६, पुणे शहरात ९६ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या एका दिवसाला सरासरी २० ते ३० हजार जणांचे लसीकरण होत आहे. हा आकडा ५० हजारपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची नोंदणी आणि लसींची उपलब्धता, पहिला आणि दुसरा डोस यांचे नियोजन यातूनच लसीकरणाला अधिक गती मिळू शकणार आहे.
-----
लसीकरण आकडेवारी
ज्येष्ठ नागरिक ४५ वरील व्याधीग्रस्त
पुणे ग्रामीण ५७९२७ ११९७९
पुणे शहर १२९१४१ २७१०३
पिंपरी चिंचवड ४६२५९ ७८४५
--
एकूण २३३३२७ ४६९२७