चिंचोशी येथे ३०९ नागरिकांचे लसीकरण.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:24+5:302021-04-17T04:10:24+5:30
ग्रामपंचायत चिंचोशी व शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन युवानेते मयूर मोहिते, ...
ग्रामपंचायत चिंचोशी व शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन युवानेते मयूर मोहिते, सरपंच उज्ज्वला सुरेश गोकुळे, उपसरपंच माया निकम, वैद्यकीय अधिकारी डाॅ. इंदिरा पारखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अमोल कानडे, मंगल शिंदे, सचिन भोसकर, कविता गोकुळे, सुभाष मोरे, सीमा गोकुळे, सुनील जाधव आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चिंचोशी येथे घेण्यात आला, असे आरोग्य अधिकारी डाॅ. इंदिरा पारखे यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी लसीकरण मोहीम यशस्वी होण्यास सहकार्य केले.
१६शेलपिंपळगाव
चिंचोशी (ता. खेड) येथे नागरिकांना लसीकरण करताना वैद्यकीय अधिकारी व मान्यवर.