मुळशी आरोग्य केंद्रात ३७९५ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:04+5:302021-04-06T04:10:04+5:30

-- घोटवडे : मुळशी तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले असून १ ...

Vaccination of 3795 persons at Mulshi Health Center | मुळशी आरोग्य केंद्रात ३७९५ जणांचे लसीकरण

मुळशी आरोग्य केंद्रात ३७९५ जणांचे लसीकरण

Next

--

घोटवडे : मुळशी तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले असून १ एप्रिल ते ५ एप्रिल पर्यंत तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर ३७९५ नागरिकांनी लसीकरण केले गेले आहे.

त्यामध्ये घोटवडे उकेंद्रावर २७५, बावधन उपकेंद्रावर १२५७, भुकूम केंद्रावर ४६२ लसीकरण झाले त्यामध्ये एस. आय. मोमीन ,शिवाजी पवार , दहीभाते काम करतात ,सूस केंद्रावर ४१२, उरवडे केंद्रावर ३७५, अंबडवेट मध्ये ३२२लसीकरण, मुळशी केंद्रावर २६७, नेरे केंद्रावर ४२५ लसीकरण झाले. कोळवन केंद्रावर संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे तेथील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

आठ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवर ३७९५ नागरिकांनी लसीकरण झाले. तुलनेने ही संख्या कमी आहे त्यामुळे लस घेतल्यावर ताप येतो, त्रास होतो अशा गैरसमजुती पसरल्या असल्याने लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्रबोधन करणे गजरेचे असल्याच डॉक्टरांनी सांगितले आहे.

लसीकरण केंद्रावर डॉ. दीपाली कांबळे, वाल्हेकर, राम करपे, अविनाश दुर्गाडे, बेबी वैरागर, एस. व्ही. चांदणे, प्रताशी मुंडे, दीपक बेंद्रे , गायकवाड, एस. व्ही. चांदणे, सागर शिंदे, हरिदास भागरे, एस. आय. मोमीन, संजय बनसोडे, संगीता काटे, बेलदार, सातपुते, एस. डी. जाधव, राम करपे, भागवत आदी अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

Web Title: Vaccination of 3795 persons at Mulshi Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.