जिल्ह्यात ५० लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:29+5:302021-07-09T04:09:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत गुरुवारपर्यंत ५० लाख ३७ हजार ...

Vaccination of 50 lakh citizens in the district | जिल्ह्यात ५० लाख नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात ५० लाख नागरिकांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत गुरुवारपर्यंत ५० लाख ३७ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने या मोहिमेचा वेग वाढवण्याची गरज आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सुुरुवातीला हेल्थ केअर वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १८ वर्षांपुढील तरुणांचे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात या लसीकरण माेहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र, त्या तुलनेत लस मिळत नसल्याने अनेकांचे लसीकरण रखडले. जिल्ह्यात लस न मिळाल्याने अनेक केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, काही दिवसांपासून लस उपलब्ध होऊ लागल्याने पुन्हा लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात १७ लाख ७९४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. पुणे महानगरपालिकेत १९ लाख ५० हजार ९४१ जणांना आतपर्यंत लस देण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ८ लाख १३ हजार ७८० जणांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ लाख ६५ हजार ५१५ जणांचे लसीकरण करण्यात आले. गुरुवारी जवळपास ५० लाख ३८ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. यातील ३४ लाख ९ हजार १११ जणांनी पहिला डोस, तर १० लाख ५६ हजार ४०४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ३७ टक्के नागरिकांचा पहिला डोस तर केवळ ११ टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील एकुण लसीकरण

क्षेत्र अपेक्षित लाभार्थी पहिला डोस टक्के दुसरा डोस टक्के एकूण टक्के

पुणे ग्रामीण ३७०४५३९ १२९७८९७ ३५ ४०२८९७ ११ १७००७९४ ४६

पुणे मनपा ३२६९८९४ १४८९३४८ ४६ ४६१५९३ १४ १९५०९४१ ६०

पिंपरी चिंचवड २२१६२८५ ६२१८६६ २८ १९१९१४ ९ ८१३७८० ३७

एकूण ९१९०७१८ ३४०९१११ ३७ १०५६४०४ ११ ४४६५५१५ ४९

Web Title: Vaccination of 50 lakh citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.