ओतूर येथे एकाच दिवशी ६५० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:13 AM2021-09-19T04:13:09+5:302021-09-19T04:13:09+5:30
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व ओतूर कृषी उत्पन्न बाजार उपबाजार आवार, ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ...
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व ओतूर कृषी उत्पन्न बाजार उपबाजार आवार, ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
ओतूर : ओतूर ( ता. जुन्नर) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व ओतूर येथील अखिल कृषी उत्पन्न बाजार बाजार गणेशोत्सव मंडळ, ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने महालसीकरण अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
महालसीकरण उपक्रमात ओतूर प्राथमिक आरोप केंद्र व परिसरातील उपकेंद्रांमधून ५०० जणांना वयाच्या अनुसार डोस देण्यात आले. अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेशोत्सव मंडळ मार्केट यार्डमधील शेतकरी, हमाल मापाडी, आडतदार व्यापारी यांना वयोगटातील नियमानुसार १५० जणांना डोस देण्यात आले. या महालसीकरण केंद्राचे उद्घाटन उपसभापती दिलीप डुंबरे यांनी केले.
यावेळी आडतदार बाळासाहेब होनराव, जि. प. सदस्य म़ोहित ढमाले, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, संचालक धनेश संचेती, संतोष तांबे, योगेश शेटे, भाजपचे भगवान घोलप, सचिव रुपेश कवडे, सहसचिव शरद घोंगडे, ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ. श्रीहरी सारोक्ते, डॉ. यादव शेखरे, डॉ. अमित काशिद, डॉ. पुष्पलता शिंदे यांनी सहकार्य केले.
फोटो मेल केले आहेत