खरपुडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:04+5:302021-04-19T04:09:04+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खरपुडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आरोग्य खात्याच्या समन्वयातून गावात लसीकरण घेण्यात आले. यासाठी जयसिंग ...
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खरपुडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आरोग्य खात्याच्या समन्वयातून गावात लसीकरण घेण्यात आले. यासाठी जयसिंग भोगाडे, माजी पंचायत समिती सभापती मंगल गायकवाड यांनी महत्वाची भूमिका बजावली. यातूनच खरपुडी येथे गुरुवारी ग्रामस्तरावर लसीकरणास करण्यात आले. या वेळी डॉ. ज्योती जाधव, आरोग्य सेविका करुणा ठाकूर, निर्मला भोगाडे, सुर्वणा भोगाडे यांनी लसीकरणास मदत केली. जयसिंग भोगाडे, मंगल गायकवाड, सरपंच विशाल काशिद, स्वरस्वती काशिद, नामदेव भोगाडे, गणेश काशिद आदीनी यावेळी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
दरम्यान, सांडभोरवाडी काळूस गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती व विद्यमान सदस्या ज्योती अरगडे यांनी लसीकरणास भेट दिली. गावातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी असे अवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आले.
१८ दावडी खरपुडी
खरपुडी ( ता खेड ) येथे कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांनी घेतली.