परदेशी विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:10+5:302021-06-25T04:09:10+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्र व भारतीय सांस्कृतिक ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्र व भारतीय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आणि ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट ॲंड यूथ’ यांच्या सहकार्याने कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून सर्व संलग्न विभागांना, महाविद्यालयांना, संस्थांना परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली असून सर्व परदेशी विद्यार्थ्यांना या लिंकवर गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे म्हणाले की, येत्या २६ जूनपर्यंत विद्यार्थी नोंदणी करू शकतील. त्यांनतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. तसेच हे लसीकरण सर्वांसाठी मोफत असेल.
------------
परदेशी विद्यार्थ्यांकडे भारतीय नागरिकत्व, आधार कार्ड नसल्याने त्यांना लसीकरण करून घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत दीडशे विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.
- डॉ. विजय खरे, संचालक
आंतरराष्ट्रीय केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ