महिला डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची फौज सांभाळतेय लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:39+5:302021-06-01T04:09:39+5:30
डॉ. स्नेहल पोरवाल यांचे नेतृत्व : हिलिंग हॅंड्स फाऊंडेशनमध्ये एका दिवसात २३०० जणांचे लसीकरण पुणे : सध्या शहरातील कमी ...
डॉ. स्नेहल पोरवाल यांचे नेतृत्व : हिलिंग हॅंड्स फाऊंडेशनमध्ये एका दिवसात २३०० जणांचे लसीकरण
पुणे : सध्या शहरातील कमी झालेली केंद्रे, नागरिकांना करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे लसीकरणात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत हिलिंग हँड्स फाऊंडेशन येथे महिला डॉक्टर आणि महिला आरोग्य कर्मचारी यांची टीम सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत लसीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. डॉ. स्नेहल पोरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवशी २०००-२३०० नागरिकांचे लसीकरण पार पडत आहे.
डॉ. स्नेहल पोरवाल १२ क्लिनिकल सहायकांचे पथक आणि १२ नर्स यांच्यासह ही मोहीम राबवत आहेत. एका दिवसात त्यांनी सुमारे २२०० लोकांना लसीकरण केले. कोविन अॅपवरून नोंदणी केल्यावर नागरिकांना जास्तीत जास्त अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच, लसीकरणादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत.