वेल्ह्यातील पाळीव जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:07+5:302021-09-22T04:12:07+5:30

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पाळीव जनावरांसाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून, तालुक्यातील नागरिकांनी या लसीकरणाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन ...

Vaccination campaign for Velha pets started | वेल्ह्यातील पाळीव जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरु

वेल्ह्यातील पाळीव जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरु

Next

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पाळीव जनावरांसाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून, तालुक्यातील नागरिकांनी या लसीकरणाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे आणि सभापती दिनकर सरपाले यांनी केले.

वेल्हे तालुक्यातील जनावरांच्या लसीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार पुरस्कृत लाळ खुरकुत रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मालवली येथे लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेत तालुक्यातील सर्व गाई, म्हशींचे लसीकरण करुन त्यांची ऑनलाईन नोंद केली जाणार आहे. तालुक्यातील २१ हजार ४७८ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कविता खोसे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, सभापती पंचायत समिती वेल्हे दिनकर सरपाले, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कविता खोसे, डॉ. भास्कर धुमाळ, डॉ. नरळे, दीपक कोडीतकर, निवृत्ती शेंडकर, दिनकर जाधव, अमित जाधव, भानुदास शेंडकर, रामदास शेंडकर, नीलेश जाधव, पांडुरंग कोडीतकर, रामदास शेंडकर, आकाश जाधव, गणपत वसवे, राहुल रेणुसे उपस्थित होते.

--

२१मार्गाने वेल्ह्यातील जनावरांचे लसीकरण सुरु

फोटो ओळी : मालवली (ता.वेल्हे) जनावरांचे लसीकरण सुरुवात करताना जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, सभापती दिनकर सरकाळे.

Web Title: Vaccination campaign for Velha pets started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.