रोटरीच्या माध्यमातून लसीकरण केंद्र उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:40+5:302021-07-25T04:09:40+5:30
इंदापूर : पोलिओमुक्त भारत करण्याचा मानस रोटरी क्लबचा आहे. सध्या कोविडच्या लसीकरण जास्तीत जास्त झाल्याशिवाय आपला देश कोविडमुक्त होऊ ...
इंदापूर : पोलिओमुक्त भारत करण्याचा मानस रोटरी क्लबचा आहे. सध्या कोविडच्या लसीकरण जास्तीत जास्त झाल्याशिवाय आपला देश कोविडमुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून लसीकरण केंद्र उभारण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत रोटरीचे डीजीई रो डॉ. अनिल परमार यांनी व्यक्त केले.
इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर व उपाध्यक्ष मुकुंद शहा व रोटरीचे फाउंडेशन डायरेक्टर पंकज पटेल, असिस्टंट गव्हर्नर प्रफुल्ल भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरीचे २०२१ - २२ या वर्षीच्या अध्यक्षपदी रो. उदय शहा व सचिवपदी रो. भीमाशंकर जाधव यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी रोटरी क्लबचे संचालक मंडळ व सर्व रोटरीयन संजय दोशी, सुनील मोहिते, नरेंद्र गांधी, नंदकुमार गुजर, वसंतराव माळुंजकर, ज्ञानदेव डोंबाळे, नितीन लोंढे, प्रशांत भिसे, दशरथ भोंग, आझाद पटेल, डॉ. यतीन शिंदे उपस्थित होते.
डॉ. परमार म्हणाले की, रोटरीच्या माध्यमातून लसीकरण केंद्र उभारल्याने, गोरगरिबांना त्याचा उत्तम फायदा होईल. ग्रामीण भागात सामाजिक काम करण्यास खूप मोठा वाव आहे.
उदय शहा म्हणाले, इंदापूर तालुक्यातील विविध सामजिक कामांसाठी एकूण तीन हजार डॉलर जमा करून खर्च करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
२४ इंदापूर रोटरी
इंदापूर रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष व सचिव यांचा सन्मान करताना रोटरीचे उच्च पदाधिकारी व मान्यवर.