तिसऱ्या लाटेअगोदरच दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे करावे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:54+5:302021-05-10T04:11:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ अधिक ...

Vaccination of children up to ten years of age should be done before the third wave | तिसऱ्या लाटेअगोदरच दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे करावे लसीकरण

तिसऱ्या लाटेअगोदरच दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे करावे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. देशभरात पहिल्या लाटेत मुलांचे संक्रमित होण्याचे प्रमाण १ टक्के होते. तर, दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ७ टक्के इतके वाढलेले आहे. पुण्यातील मुलांची आकडेवारी देखील अशीच आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह केसपैकी सुमारे ७ ते १०% प्रमाण हे महाराष्ट्राचे आहे. जगभरातील आकडेवारी पाहिल्यास कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी आव्हानात्मक आहे. या आजाराचा धोका व मृत्यू टाळण्यासाठी लसीकरण दहा वर्षापर्यंत अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णत: ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेसंदर्भातील चर्चा सुरू झाली आहे. केंद्राचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांच्या सांगण्यानुसार कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. तिसरी लाट आलेल्या देशांचा आढावा घेतल्यास त्यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. सध्याच्या लसीकरण कार्यक्रमात १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचा समावेश केला आहे. मात्र, लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकसंख्या असलेल्या मुलांचा लसीकरणात समावेश झालेला नाही. त्यामुळे हा वर्ग असुरक्षित व धोकादायक स्थितीत असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बाडगे म्हणालज्की, मुलांचे तिसऱ्या लाटेच्या संकटापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण हे कोरोनामध्ये मुलांना अधिक चांगले संरक्षण देऊ शकते. फाइजर-बायोटेक या अमेरिकेत लसीकरण करणाऱ्या लशीचा डोस मुलांना दिला जात आहे. त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. १२ ते १५ वर्षे वयोगटातील लशीने १०० टक्के कार्यक्षमता दर्शविली आहे. तर सहा महिने ते ११ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या गटावरील अभ्यास मॉडर्न तर्फे सुरू झाला आहे.

-----------------------------------------------------------------

लसीकरण होईपर्यंत १८ वर्षांखालील मुलांनी घरातच राहावे. शाळा, परीक्षा टाळावी आणि ज्येष्ठांचा संपर्क टाळावा. मास्क घालण्याबरोबरच हाताची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला लक्षणे दिसत असल्यास तत्काळ चाचणी करा व स्वत:ला इतरांपासून वेगळे करा. आपल्याकडे लहान मुलांसाठी लसीकरण सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात मुलांचे संरक्षण करता येईल.

-डॉ. अर्चना खेर, बालरोगतज्ज्ञ

-----------------

Web Title: Vaccination of children up to ten years of age should be done before the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.