पुणे शहरात सोमवारी ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६५ केंद्रांवर लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:14 PM2021-05-23T21:14:48+5:302021-05-23T21:14:54+5:30

ऑनलाईन बुकिंग सकाळी आठला सुरू होणार

Vaccination of citizens above 45 years of age at 65 centers in Pune city on Monday | पुणे शहरात सोमवारी ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६५ केंद्रांवर लसीकरण

पुणे शहरात सोमवारी ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६५ केंद्रांवर लसीकरण

Next
ठळक मुद्देनागरिकांना नियमानुसार पहिला आणि दुसरा डोस मिळणार

पुणे: शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या डोससाठी ऑनलाईन बुकिंग सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे़. पुणे महापालिकेच्या ६५ केंद्रांवर याकरिता कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे़.  

कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवस पूर्ण झालेल्यांनाच द्यायच्या या नियमामुळे लाभार्थी संख्या मर्यादित असल्या कारणामुळे, शहरात गुरूवारपासून (दि़२० मे) पुन्हा ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या डोसकरिताचे लसीकरण सुरू करण्यात आले होते़. मात्र लससाठा संपल्याने, शनिवारी शहरात लसीकरण ठप्प झाले होते़.  मात्र शनिवारी रात्री महापालिकेकडे १३ हजार लस प्राप्त झाल्याने, त्यानुसार रविवारी लसीकरण करण्यात आले असून, सोमवारी शहरातील ६५ लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे़.  

सोमवारी उपलब्ध लसींच्या एकूण साठ्यांपैकी ६० टक्के लस या ऑनलाईन अपॉइंर्मेंट/ स्लॉट बुक केलेल्या नागरिकांनाचा त्याही ४५ वर्षांवरील वयोगटासाठी पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत़. तर २० टक्के लसीचे डोस हे ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस ऑफलाईन (केंद्रांवर नोंदणी) पध्दतीने नोंदणी करून देण्यात येणार आहे़   याचबरोबर २० टक्के लस या पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२४ फेब्रुवारीपूर्वी) घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहेत़.  

Web Title: Vaccination of citizens above 45 years of age at 65 centers in Pune city on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.