देशात लसीकरण होतेय संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:59+5:302021-03-16T04:11:59+5:30

प्रफुल्ल कोठारी यांचे डायग्रोपेन डायग्नोस्टिक सेंटर प्रस्तुत आणि डॉ.अनुज गजभिये यांचे हिरल आर्मीस अर्थोपेडिक क्लिनिक यांच्या विशेष सहयोगाने सोमवारी ...

Vaccination in the country is slow | देशात लसीकरण होतेय संथ गतीने

देशात लसीकरण होतेय संथ गतीने

Next

प्रफुल्ल कोठारी यांचे डायग्रोपेन डायग्नोस्टिक सेंटर प्रस्तुत आणि डॉ.अनुज गजभिये यांचे हिरल आर्मीस अर्थोपेडिक क्लिनिक यांच्या विशेष सहयोगाने सोमवारी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर ‘हेल्थ हार्मनी’ या कार्यक्रमात डॉ. ग्रँड बोलत होते.

पुण्यात सर्वात जास्त गंभीर लक्षणे आढळणारे रुग्ण कोरोनाच्या पाहिल्या लाटेत आढळून आले. याची दखल घेत, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे चालविण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने देशातील पुण्यासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर लसींचे उत्पादन झाले असताना, महानगरपालिकेकडेच लस उपलब्ध नसल्याची दुर्दैवी वेळ आली आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, तरुणांना सध्या लस घेता येत नसेल, तर त्यांनी प्रथम बीसीसी लस घ्यावी. त्यानंतर, कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण सापडले, त्याची लक्षणे तुलनेने मागच्या लाटेपेक्षा कमी गंभीर आहेत.

लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेले असतानाही केवळ परवानगीच्या कचाट्यात लस सापडल्याने, लवकर लस बाजारात दाखल झाली नाही. हे दुर्दैव आहे. खरे तर लसीसाठी मुक्त बाजरपेठ असली पाहिजे, असे मत डॉ.ग्रँड यांनी व्यक्त केले.

Web Title: Vaccination in the country is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.