वंचित नागरिकांना लसीकरणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:05+5:302021-04-27T04:10:05+5:30
कळस : आपल्या कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या आचारसंहितेचे पालन करत लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांचे लसीकरण त्वरित ...
कळस : आपल्या कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या आचारसंहितेचे पालन करत लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांचे लसीकरण त्वरित प्राधान्याने करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी केले
कळाशी (ता. इंदापूर) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कळाशी येथेही कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. कळत-नकळत फैलावणाऱ्या कोरोनाच्या विषाणूने सारे जनजीवन विस्कळीत केले आहे. या रोगाचा फैलाव झपाट्याने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या लसीकरण करून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. याबाबत काही त्रुटी येत असल्यास त्याचे निवारण करण्यास सांगितले.
संकटाचा काळ असून आपली व आपल्या कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेतली जावी. या वेळी सहकार बोर्डाचे संचालक राजेंद्र गोलांडे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. सुनील गावडे, डॉ. जाधववर, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक पाटील, पोलीस पाटील प्रदीप भोई, युवराज रेडके ग्रामपंचायत सदस्य, हनुमंत बाबर, तानाजी कांबळे, विठ्ठल करगळ,चंद्रकांत देवकर, दादा भालेकर, सागर सपकळ, काका चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
—————————————————
फोटो : कळाशी (ता. इंदापूर) येथे नागरिकांचे लसीकरण त्वरित करण्याचे आवाहान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी केले.
२६०४२०२१-बारामती-११
————————————————