महाळुंगे पडवळ आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:37+5:302021-03-17T04:10:37+5:30
कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असून नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा ...
कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असून नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गिते व डॉ.क्षितीजा शिंदे यांनी केले आहे
.प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ परिसरातील लांडेवाडी,गिरवली,नारोडी, नांदूर,लौकी,कळंब,साकोरे, विठ्ठलवाडी,चास आदी गावांतील ज्येष्ठ नागरिक,आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका,शिक्षक व सरकारी कर्मचारी यांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे.
लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येऊ नये म्हणून 'कोरोना लसीकरण मदत कक्ष' सुरु करण्यात आला असून येथे कम्युनिटी हेल्थ अधिकारी जयसिंग मिरपागर,प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष रामचंद्र थोरात,शिक्षक युवराज आवटे,आरोग्य पर्यवेक्षक डी.एम.भागवत,आरोग्यसेवक करण परदेशी,कैलास बोऱ्हाडे,नामदेव मराडे हे ऑनलाईन नोंदणीचे काम करत असून नागरिकांना समुपदेशन करत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी गिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका क्षितीजा शिंदे,अर्चना निंबाळकर,सरिता पडवळ नागरिकांना लसीकरण करत आहे.नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स राहावा यासाठी परिचर प्रशांत पिंगळे,परिचर एल.व्ही.जोशी देखरेख करत आहे.
महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना परिचारिका.