महापालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:26+5:302021-06-02T04:09:26+5:30
पुणे : पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे़ याची सुरुवात ...
पुणे : पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे़ याची सुरुवात ३१ मेपासून झाली असून, सध्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांचे लसीकरण करण्यात येत आहे़
यामध्ये फ्रंटलाइन वर्कर्स, त्यांचे नातेवाईक, मनपा मुख्य इमारतीची स्वच्छता करणारे कंत्राटी सफाई सेवक, शहरात विविध ठिकाणी मॅकॅनिकल स्वीपिंग करणारे कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या ठिकाणी कार्यरत असणारे कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ३१ मे रोजी १४० कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच १ जून रोजी २५० जणांचे लसीकरण करण्यात आले़ यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अजित देशमुख आदी उपस्थित होते़
-------------------------