खेड तालुक्यात एक लाख ८२ हजारा नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:39+5:302021-08-01T04:11:39+5:30

तालुक्यात आज अखेर मोफत तेरा लसीकरण केंद्रावर आतापर्यत राजगुरुनगर केंद्रावर २१ हजार ६४६, शेलपिंपळगाव केंद्रावर २५ हजार ...

Vaccination of one lakh 82 thousand citizens in Khed taluka | खेड तालुक्यात एक लाख ८२ हजारा नागरिकांचे लसीकरण

खेड तालुक्यात एक लाख ८२ हजारा नागरिकांचे लसीकरण

Next

तालुक्यात आज अखेर मोफत तेरा लसीकरण केंद्रावर आतापर्यत राजगुरुनगर केंद्रावर २१ हजार ६४६, शेलपिंपळगाव केंद्रावर २५ हजार ८६, वाडा प्राथमिक केंद्रावर ९ हजार ६९९, वाफगाव केंद्रावर १८ हजार २४७, चाकण केंद्रावर ११ हजार ४६४, चांडोली केंद्रावर १४ हजार ७१, तर आळंदी केंद्रावर १० हजार,आंबोली केंद्रावर ३ हजार ८९६ नागरीकांचे लसीकरण झाले.डेहणे केंद्रावर ३ हजार ३३२, तर आदिवासी गावातुन ३ हजार ४३६, कुडे केंद्रावर २ हजार ८७७, तर आदिवासी गावातुन २ हजार ३३३, कडुस केंद्रावर १२ हजार ९१० , करंजविहिरे केंद्रावर २६ हजार ३८८, पाईट केंद्रावर ८ हजार २९९ नागरीकांचे २९ जुलै अखेर लसीकरण पार पडले. तर तालुक्यात खाजगी हाँस्पटल मध्ये विकत लसीकरण सध्या बंद असले तरी या अगोदर नागरीकांनी विकत लसीकरण करुन घेतले राजगुरुनगर मधील अँपेक्स हाँस्पिटलमध्ये ८८१, आळंदीतील इंद्रायणी मध्ये ९१२, चाकणमधील श्वास मध्ये ६ हजार ७३४, आणि क्रीटीकेयर मध्ये ५१९ नागरीकांनी लसीकरण होऊन एकुण १ लाख ८२ हजार ८७० नागरीकांचे लसीकरण झाले.

तालुक्यात लसीकरणासाठी पुणे येथुन वेळेवर दररोज लसीच्या मात्रा येईल याची शाश्वती नसल्यामुळे आरोग्य यत्रंणेची मात्र दिवसेदिवस ताण वाढत आहे. नागरीकांना ही हेलपाटे मारत ताटकळत रांगेत उभे राहुन ताटकळत थांबावे लागत आहे. एकुण डोसपैकी प्रथम डोस इतके,तर सेकंड चे इतके डोस असे वर्गीकरण त्यात पुन्हा वयोगटानुसार त्याचे वर्गीकरण शासनस्तरावरुन ठरलेले असते एखाद्या लसीकरण केंद्रात शंभर डोस आले असताना वर्गीकरण डोस शिल्लक ठेवणे बंधनकारक केलेले असते.

Web Title: Vaccination of one lakh 82 thousand citizens in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.