यवत येथे लसीकरण ऑनलाइन नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:33+5:302021-04-08T04:10:33+5:30
कोरोना लसीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र गावातील अशिक्षित, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन नोंदणी साठी अनेक अडचणींना ...
कोरोना लसीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र गावातील अशिक्षित, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन नोंदणी साठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
सरपंच समीर दोरगे यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेत लसीच्या ऑनलाइन नोंदणी साठी केंद्र सुरू करून मोठी अडचण सोडविली आहे.यवत येथील ग्रामीण रुग्णालयात ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. यवत परिसरातील नागरिकांनी यवत ग्रामीण रुग्णालयजवळ लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल घेऊन नोंदणी केंद्रात येऊन लसीची नोंदणी करावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
०७यवत
यवत ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना लसीकरण नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले.