आजपासून ३० वर्षांवरील वयोगटाचेही लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:25+5:302021-06-19T04:09:25+5:30
पुणे : महापालिकेने आजपासून (दि.१९) शहरात ३० वर्षांवरील नागरिकांनाही कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली असून, महापालिकेच्या १५ लसीकरण केंद्रांवर ...
पुणे : महापालिकेने आजपासून (दि.१९) शहरात ३० वर्षांवरील नागरिकांनाही कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली असून, महापालिकेच्या १५ लसीकरण केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील वर्गाला ही लस आॅनलाइन बुकिंग करून दिली जाणार आहे़ याकरिता सकाळी आठ वाजता आॅनलाइन स्लॉट सुरू ओपन होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे़
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रत्येकी एक अशा १५ केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटासाठी लस उपलब्ध राहणार आहे़ उपलब्ध लसीपैकी ४० टक्के लस ही आॅन स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़ हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर व ३० ते ४४ वर्षापर्यंत नागरिकांना ही लस उपलब्ध असणार आहे़ महापालिकेच्या १४८ केंद्रांवर शनिवारी कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून, या ठिकाणी हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर व ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे़ १८ वर्षे वयोगटावरील ज्यांनी २१ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना आज प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे़
------------
शहरातील शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटल, बावधन येथील डीआरडीओ, पुणे विद्यापीठ, ससून रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल पुणे स्टेशन, एसआरपीएफ वानवडी व एनडीए खडकवासला येथे महापालिकेने प्रत्येकी १०० कोविशिल्ड लसीचा पुरवठा केला असून, याठिकाणी आज ८० टक्के लस ही आॅन स्पॉट नोंदणी करून उपलब्ध राहणार आहे़ तर २० टक्के लस ही ज्या नागरिकांनी २७ मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे त्यांना दिली जाणार आहे़