मुळशीत ७२ टक्के लसीकरण मुळशीत ४२ हजार १४२ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:06+5:302021-04-20T04:10:06+5:30
तालुक्यातील मुख्य आरोग्य केंद्र पौड, माण, तसेच ९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर ४५ वर्षे वयापुढील नागरिकाचे लसीकरणाचे ...
तालुक्यातील मुख्य आरोग्य केंद्र पौड, माण, तसेच ९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर ४५ वर्षे वयापुढील नागरिकाचे लसीकरणाचे काम सुरू आहे. ४२ हजार १४२ लसीकरण झालेल्यांपैकी ३९ हजार ९०० नागरिकांनी पहिला डोस घेतला, तर २ हजार २४२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. लसीकरण घेण्यासाठी अजून ५२ हजार ३८७ नागरिक शिल्लक असून, पहिला डोसही न घेतल्यांमध्ये १४ हजार ७२९ नागरिक तर दुसरा डोस ३७ हजार ६५८ नागरिकांना देणे बाकी आहे. स्थानिक प्रशासन त्यात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र , व सामाजिक कार्यकर्ते यांनी शिल्लक राहिलेल्या नागरिकांना लसीकरण करणे गरजेचे असल्याबद्दल जनजागृती करणे जरुरी आहे, मुळशीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, गुजर, वैशाली पाटील, पिरंगुट, उत्तम गायकवाड बावधन, मते, कोळवण, शेटे माले, राऊत सूस, दीपाली कांबळे, घोटवडे, सोनाली पात्रीकर नेरे, हे अधिकारी जीवाची बाजी लावून लसीकरणाचे काम करताना दिसत आहेत.