विमाननगरमध्ये ज्येष्ठांसाठी लसीकरण नोंदणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:23+5:302021-03-22T04:09:23+5:30
नगरसेवक राहुल भंडारे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण नोंदणी शिबिराचे विमाननगर येथे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे ...
नगरसेवक राहुल भंडारे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण नोंदणी शिबिराचे विमाननगर येथे आयोजन केले होते.
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड व संपर्क क्रमांक दिल्यानंतर त्यांची नावनोंदणी करून त्यांना कोविड लसीकरणाची माहिती व इतर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन विमाननगर येथील डॉ. निधी अगरवाल,डॉ. सोनवणे, डॉ. गजभिये, डॉ. जाधव, डॉ. येवले यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेषस्तुत्य उपक्रमाचे सर्व डॉक्टरांनी कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा भगवदगीता ग्रंथ देवून नगरसेवक राहुल भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय गवळी यांनी केले. यावेळी विमाननगर परिसरातील मान्यवर डॉक्टरांसह, विजय परिहार,पराग येणकर, राजेश समर्थ, अनमोल सांव, सॅंन्डी मस्के, ओमकार सोनवणे,धनंजय भिंगारदीवे, दीपक चव्हाण यांच्यासह स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
फोटोओळ - ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी विमाननगर येथे आयोजित विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करताना नगरसेवक राहुल भंडारे व परिसरातील मान्यवर डॉक्टर.