कुरवली आरोग्यकेंद्र व उपकेंद्रात लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:22+5:302021-04-07T04:10:22+5:30
कुरवलीत कोविड १९ लसीकरण कुरवली, ता. इंदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड १९ लसीकरण शुभारंभ तालुका ...
कुरवलीत कोविड १९ लसीकरण
कुरवली, ता. इंदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड १९ लसीकरण शुभारंभ तालुका विस्तार अधिकारी किरण मोरे, सरपंच शोभा पांढरे यांच्या हस्ते करण्यात आला. कुरवली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत चिखली, जांब ,मानकरवाडी येथील वाडी-वस्ती मधील ४५ वर्षांवरील ३०० नागरिकांना लस देण्यात आली.शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थ्यांना नोंदणी करून या सुविधेचा लाभ देण्यात येत असल्याचे कुरवली सरपंच शोभा पांढरे यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या संसर्गाला प्रतिबंध म्हणून शासनाच्या माध्यमातून लसीकरण सुरुवात करण्यात आली आहे.तालुक्यात आरोग्यकेंद्र व उपकेंद्रात लसीकरण सुरू आहे. गावातील ४५ वर्षांपुढील नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लसीकरण करण्यात आले. गावातील उपकेंद्रात नागरिकांना लस दिल्यानंतर दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या जात आहेत.लसीकरण मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.मेघा लोंढे, समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी मारकड , आरोग्य सहाय्यक ईशा सोलापुरे ,आरोग्यसेवक हर्षद साबळे, आरोग्यसेविका संगीता कोकरे ,आशासेविका शैला पांढरे, मनीषा पांढरे,निर्मला कदम ,मनीषा माने,आशा मोरे, यांनी सहभाग घेतला.यावेळी ग्रामसेवक ज्ञानोबा काळे ,लोणकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चव्हाण, स्वप्नील माने ,
ग्रामस्थ बापूराव पांढरे, योगेश माने ,आनंदराव माने , चंद्रकांत माने,शिवाजी चव्हाण, विठ्ठल फडतरे , दिपक कदम ,लिपीक शिवाजी गायकवाड, अमर सुळ , संजय गायकवाड उपस्थित होते.
फोटो ओळ - कुरवली येथे लसीकरण करताना